Petrol Diesel Price: महागाईचा भडका, पेट्रोल - डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ

 Petrol Diesel Price: देशात महागाईचा दिवसागणिक भडका उडताना दिसत आहे.  

Updated: Oct 27, 2021, 12:40 PM IST
Petrol Diesel Price: महागाईचा भडका, पेट्रोल - डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ title=
संग्रहित छाया

मुंबई : Petrol Diesel Price: देशात महागाईचा दिवसागणिक भडका उडताना दिसत आहे. ऐन दिवाळीत पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 113.80 पोहोचली आहे. तर दिल्लीत पेट्रोल 107.94 झाले आहे. 

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीच्या भडका उडाल्याने महागाईत भर पडली आहे. दोन दिवसानंतर, बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 रोजी पुन्हा एकदा तेलाच्या किमती वाढल्या आहेत. सरकारी तेल कंपन्या IOC, HPCL आणि BPCL यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आज देशातील विविध शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घेऊया.

जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवी दर (Petrol Diesel Rate Today)
शहर          पेट्रोल (रु/ प्रति लीटर)             डिझेजल (रु/ प्रति लीटर)  
दिल्ली              107.94                                 96.67 
मुंबई                113.80                                 104.75
कोलकाता         108.45                                  99.78
चेन्नई              104.83                                 100.92

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर हे शंभरीच्या पुढे गेले आहेत. दिल्ली पेट्रोल 107.94  तर डिझेल 96.67 रुपये, मुंबईत पेट्रोल 113.80 रुपये झाले असून डिझेलचा दर 104.75 वर पोहोचला आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 108.45 तर 99.78 डिझेल मिळत आहे. तर चेन्नई 104.83 रुपये पेट्रोल असून मुंबईनंतर डिझेलने येथे शंभरी पार केली आहे. 100.92 रुपये लिटर डिझेल झाले आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्ही पाहू शकता. पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइल IOC तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील 9224992249 या क्रमांकावर RSP आणि तुमचा शहर कोड पाठवण्याची सुविधा देते. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुमच्या मोबाईलवर लगेच येतील. प्रत्येक शहराचा वेगळा कोड असतो, जो IOC तुम्हाला त्यांच्या वेबसाइटवर देतो

दररोज सकाळी 6 वाजता दर बदलतात

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर दररोज सकाळी 6 वाजता लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर अनेक गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.