Petrol Price Today : अखेर पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; आज काय आहेत दर

आज काय आहेत पेट्रोल - डिझेलचे दर   

Updated: Aug 24, 2021, 08:44 AM IST
Petrol Price Today : अखेर पेट्रोल-डिझेलच्या दरात घट; आज काय आहेत दर title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ नोंदवण्यात येत होती. पण अखेर आता पेट्रोल-डिझेल दर वाढीला ब्रेक लागला आहे. याआधी रविवारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले होते. पण याआधी डिझेलच्या दरात चारवेळ घट नोंदवण्यात आली होती. डिझेलच्या दरात  चारवेळा घट झाल्यामुळे पेट्रोल 80 पैशांनी स्वस्त झालं. भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात.

जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड 4 महिन्यांच्या नीचांकावर घसरला आहे. कच्चे तेल 66-68 डॉलर प्रति बॅरल दरम्यान फिरत असल्याचे दिसते. तरी देखील तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या दर कमी होत नव्हते. पण आता पेट्रोल डिझेलच्या दरात घट झाली आहे.  मुंबईत आज पेट्रोलसाठी 107.52 रूपये मोजावे लागत आहे. तर डिझेलसाठी 96.48 रूपये मोजावे लागत आहे. 

शहर                         पेट्रोल          डिझेल 
नई दिल्ली                101.49         88.92
मुंबई                       107.52         96.48
कोलकाता                101.82         91.98
चेन्नई                        99.20          93.52

आपल्या शहरातील आजची किंमत जाणून घ्या
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. आपल्याला  SMSद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर देखील मिळू शकतात (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर माहिती मिळवू शकतात. त्याचवेळी, एचपीसीएल ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPrice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.