'एकही पीपीई किट नसणाऱ्या भारतात दिवसाला दोन लाख किट्सची निर्मिती'

२१ शतक भारताचं आहे....   

Updated: May 12, 2020, 09:01 PM IST
'एकही पीपीई किट नसणाऱ्या भारतात दिवसाला दोन लाख किट्सची निर्मिती' title=
छाया सौजन्य- एएनआय

नवी दिल्ली : देशापुढे असणारं Coronavius कोरोना विषाणूच्या संसर्गाचं मोठं आव्हान पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करत काही महत्त्वाच्या गोष्टी सर्वांसमक्ष मांडल्या. यावेळी विषाणूच्या प्रादुर्भावासोबतच देशाने कशात प्रकारे या संकटसमयी जिद्दीने लढा दिला ही बाबही केंद्रस्थानी ठेवली. 

देशांतर्गत प्रगतीचा आलेख यावेळी मोदींनी आवर्जून समोर आणला. ज्याअंतर्गत कोरोनाच्या आव्हानाच्या सुरुवातीच्या काळात भारत पीपीई किट्ससाठी इतरांच्या मदतीवर अवलंबून होता, त्याच राष्ट्रात आजच्या घडीला दिवसाला जवळपास दोन लाख पीपीई किट्सची निर्मिती करण्यात येत आहे. तर, सुरुवातीला नाममात्र उत्पादन असणाऱ्या एन ९५ मास्कचीही निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. संकटाच्या वेळीसुद्धा भारतीयांनी काही अंशी त्याचं संधीत रुपांतर केलं आहे. मुख्य म्हणजे ही संधी असण्यासोबतच एक इशाराही असल्याची बाब पंतप्रधानांनी नमूद केली. 

स्वयंपूर्ण असण्याचे निकष पूर्ण बदलले असल्याचं म्हणत स्वावलंबी भारताचं नवं स्वप्न मोदींनी दाखवलं. भारतीय संस्कृती ही संपूर्ण जगासाठीच आशेचा किरण असल्याचं सांगत पंतप्रधानांनी देशातील नागरिकांच्या आत्मविश्वासाची दाद दिली. 

 

२१ वं शकत हे भारताचं आहे, असं म्हणत त्यांनी देशवासियांवर एक मोठी जबाबदारी सोपवली. मुळात भारतापुढे असणाऱ्या सर्व संधी पाहता कोरोनामुळे बऱ्याच गोष्टी विस्तृत स्वरुपात उमगल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.

वाय येणाऱ्या काळाकडे एक स्वप्न नव्हे, तर एक जबाबदारी म्हणून पाहण्याचा संदेशही दिला. देश म्हणून आपण एका निर्णायक टप्प्यावर असल्याचं म्हणत त्यांनी वारंवार आपल्या संबोधनातून एकजुटीने या संकटावर मात करत देशाचीही प्रगती तितक्याच वेगाने करण्यासाठीचा आग्रही संदेश दिला.