close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पंतप्रधानांचा 'हा' छोटा पाहुणा सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर सकाळपासून हा फोटो चांगलाच व्हायरल झाला.

Updated: Jul 23, 2019, 06:11 PM IST
पंतप्रधानांचा 'हा' छोटा पाहुणा सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. एखाद्या राज्यात दौऱ्य़ावर गेल्यानंतर पारंपरिक वेशभुषेतील फोटो असोत किंवा स्थानिक वाद्य वाजवतानाच्या फोटोंमुळे मोदी नेहमीच चर्चेत असतात. आजदेखील मोदींनी संसदेतील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. 

या फोटोसोबत त्यांनी मला संसदेत भेटायला आलेला खूप खास मित्र, असे कॅप्शनही लिहले होते. या फोटोत नरेंद्र मोदी एका चिमुकल्याबरोबर खेळताना दिसत आहेत. एरवी आई सोडली तर नरेंद्र मोदी नातेवाईकांबरोबर फारसे रमताना दिसत नाहीत. त्यामुळे या फोटोतील लहान मुलाविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. त्यामुळे सोशल मीडियावर सकाळपासून हा फोटो चांगलाच व्हायरल झाला.

अखेर काहीवेळानंतर या सगळ्याचा उलगडा झाला. हा चिमुरडा राज्यसभेतील भाजपचे खासदार सत्यनारायण जटिया यांचा नातू आहे. सत्यनारायण जटिया मंगळवारी आपला मुलगा राजकुमार, सून आणि नातवाला घेऊन संसदेत आले होते. यावेळी त्यांनी मोदींची भेट घेतली. तेव्हा मोदींना या चिमुकल्याशी खेळण्याच मोह आवरला नाही. या फोटोंमध्ये नरेंद्र मोदी आपल्या नातवाप्रमाणेच या चिमुरड्याचे लाड करताना दिसत आहेत.