देशातील दुसरे सर्वात युवा खासदार होणार राघव चड्ढा, CA ते MP असा होता प्रवास

पंजाबमध्ये 5 राज्यसभा सदस्यांसाठी 31 मार्चला मतदान होणार आहे. पंजाबमध्ये मिळालेल्या मोठ्या बहुमतानंतर आपचे सर्व सदस्य जवळजवळ राज्यसभेवर निवडून जाणार आहेत.

Updated: Mar 22, 2022, 09:36 PM IST
देशातील दुसरे सर्वात युवा खासदार होणार राघव चड्ढा, CA ते MP असा होता प्रवास title=

नवी दिल्ली : दिल्लीतील आमदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांना आम आदमी पक्षाने पंजाबमधून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राघव चड्ढा यांनी यासाठी सोमवारी अर्ज दाखल केला. राघव चड्ढा फक्त ३३ वर्षाचे आहेत. राज्यसभेवर जाणारे ते दुसरे सर्वात युवा खासदार असतील. याआधी 32 वर्षाचे अनुभव मोहंती राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. तसेच 33 वर्षाची बॉक्सर मेरीकॉम देखील राज्यसभा खासदार आहे. (second youngest MP)

पंजाबमध्ये 5 राज्यसभा सदस्यांसाठी 31 मार्चला मतदान होणार आहे. पंजाबमध्ये मिळालेल्या मोठ्या बहुमतानंतर आपचे सर्व सदस्य जवळजवळ निवडून जाणार आहेत. 117 जागांच्या राज्यात आपने 92 जागांवर विजय मिळवला आहे.

राघव चड्ढा  (Raghav Chadha) एक नंतर एक रेकॉर्ड मोडत आहेत. 22 वर्षात ते पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते झाले होते. 26 च्या वयात ते खजिनदार झाले. या दरम्यान त्यांनी अनेक वेळा इनकम टॅक्सच्या नोटीसचा सामना केला. 2013 निवडणुकीमध्ये राघव चड्ढा घोषणापत्र बनवणाऱ्या कमेटीचे सदस्य होते.

राघव चड्ढा हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांचे खूप जवळचे मानले जातात. हेच कारण आहे की त्यांना पक्षाकडून मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जतात. 2020 मध्ये त्यांना दिल्ली जल बोर्डाचा उपाध्यक्ष बनवण्यात आला. राघव चड्ढा  (Raghav Chadha) राजेंद्र नगर मतदारसंघातून निवडून आले होते. पंजाब निवडणुकीत (Punjab Election) राघव चड्ढा यांना सह प्रभारी बनवण्यात आले होते. उमेदवारांची निवड पासून त्यांच्या विजयापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सीए आहेत राघव चड्ढा

राघव चड्ढा यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत झाला. मॉडर्न स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतल्यानतंर दिल्ली यूनिवर्सिटीमध्ये पदवी मिळवली. आता ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून त्यांनी EMBA सर्टिफिकेशन कोर्स देखील केला आहे.