मी १५ मिनिटे संसदेत बोललो तर मोदी उभे राहू शकत नाही - राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज अमेठी दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं.  

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 17, 2018, 02:41 PM IST
मी १५ मिनिटे संसदेत बोललो तर मोदी उभे राहू शकत नाही - राहुल गांधी title=

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज अमेठी दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं. मोदींच्या राज्यात अच्छे दिन आले ते नीरव मोदी आणि मेहुल चौकसीचे. गरिबांचे खिसे मात्र रिकामे झाल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. राहुल गांधी सध्या दोन दिवसाच्या अमेठी दौऱ्यावर आहे. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मोदी सरकारवर ही टीका केली. मला संसदेत १५ मिनिटे बोलण्याची संधी मिळाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहू शकणार नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत उभे राहून बोलण्यास घाबरतात. मला १५ मिनिटे भाषण करण्यास संसदेत मिळाले तर मोदी बोलू शकत नाही. राफेल प्रकरण असो किंवा निरव मोदीचे प्रकरण असो. पंतप्रधान मोदी उभे राहू शकत नाही. देशात सध्या कॅशचा तुटवडा जाणवत आहे. मोदी यांनी देशातील बॅंकिंग व्यवस्था बेकार करुन ठेवलेय. नीवर मोदी ३० हजार कोटी घेऊन पळालाय. मात्र, पंतप्रधान मोदी त्याबाबत एकही शब्द काढत नाही. मात्र, आमच्या खिशातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोच्या काढून घेतल्या आणि निरव मोदीला दिल्यात. आज देशात कॅश नसल्याने अनेकांना एटीएम समोर उभे राहावे लागत आहे. त्यांनी लोकांना मजबूर केलेय.

राहुल गांधी सोमवारपासून अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी पाली गावातील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रश्न समजून घेतले. या प्रश्नांबाबत आपण संसदेत बोलू असे आश्वासन राहुल गांधी यांनी त्यांना दिले.