Viral Video: पोलिसाच्या वेशात आला, त्यानं पाणी मागितलं अन्... थरकाप उडवणारी घटना CCTV मध्ये कैद!

Police Viral Video: मंगलमन सीटी सोसायटीमध्ये (Rajasthan crime news) ही घटना घडली होती. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पोलिसांच्या गणवेशात एक व्यक्ती दिसत आहे. तेवढ्यात...

Updated: Nov 20, 2022, 02:10 AM IST
Viral Video: पोलिसाच्या वेशात आला, त्यानं पाणी मागितलं अन्... थरकाप उडवणारी घटना CCTV मध्ये कैद! title=
Police Viral Video

Crime News : मागील तीन वर्षात देशात गुन्हेगारी (Crime Rate) मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती सरकारच्या अहवालातून समोर आली होती. त्यात चोरीच्या घटनांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. अशातच सध्या एका लुटमारीच्या घटनेचा थरारक व्हिडीओ (CCTV Robbery Video) सीसीटीव्हमध्ये कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. (rajasthan crime news loot in the house of women by glass of water vicious thief seen in police uniform video)

जयपूरच्या मंगलमन सीटी सोसायटीमध्ये (Rajasthan crime news) ही घटना घडली होती. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पोलिसांच्या गणवेशात एक व्यक्ती दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक पुरुषाने घरासमोर उभं राहून एका महिलेकडे पाणी मागितलं. महिला फ्लॅ़टच्या घरात राहत असल्याचं दिसतंय. पोलिसी वेशात (Thief Seen In Police Uniform) असलेल्या या तरूणाने तोंडावर मास्क लावल्याचं दिसतंय.

आणखी वाचा - मेहुणे, मेहुणे, मेव्हण्यांचे पाहुणे सगळेच... लग्न झाल्यावर घरी जाताना झाला मोठा गेम!

त्याने प्रथम महिलेला पाणी मागितलं. त्यावेळी महिलेने त्याला पाणी दिलं. त्यानंतर आणखी थोडं पाणी त्याने महिलेकडे मागितलं. त्यावेळी पाणी आणायला गेलेल्या महिलेने गेट लावून घेतलं. त्यामुळे त्याला घरात जाता आलं नाही. त्यानंतर महिला पाणी घेऊन आली. त्यावेळी त्यानं पाणी पिता पिता गेट ओढलं आणि महिलेला आत खेचलं. त्यावेळी चोराच्या आणखी दोन साथिदारांनी त्याला मदत केली.

पाहा Video -

दरम्यान, चोरीने अचानक गेट उघडल्याने महिलेने आरडाओरडा सुरू केला. मात्र, तिच्या मदतीला कोणीही आलं नाही. हे प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, हा सीसीटीव्ही व्हिडीओ (loot in the house) सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय. अनेकांनी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्वत:चे देखील अनुभव मांडले आहेत.