मुंबई : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी आज पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर केला. रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची वाढ केली.
गेल्या सहा महिन्यांपासून महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे याआधी रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रणात आणण्याच्या हेतूने व्याजदरात दोन टप्प्यात 0.90 टक्क्यांची वाढ केली होती. आज पुन्हा 0.50 टक्यांची वाढ केल्याने एकून रेपो दरात तिसऱ्या टप्प्यात 1.40 टक्क्यांची वाढ होऊन 5.40 टक्के इतका झाला आहे.
जगाच्या तुलनेत देशांतर्गत महागाई काही प्रमाणात नियंत्रणात असली, व्याजदरवाढींमुळे लोकांचे गृहकर्जाचे हप्ते लक्षणीय प्रमाणात वाढले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आजच्या पतधोरण आढावा बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे कर्जाच्या व्याजदरात आणखी वाढ होणार आहे.