डूंगरपूर : कोरोना लॉकडाऊन दरम्यान, डूंगरपूर जिल्ह्यातून खळबळजनक माहिती समोर आली आहे. ज्यात साडे चार कोटी रुपये पकडले गेले आहेत. संबधित कार दिल्लीवरून गुजरातमध्ये येत होती. पोलिसांनी कारची तपासणी केली तेव्हा कारच्या सीटखाली नोटांचे बंडल पाहून पोलिस आवाक झाले. कारमध्ये बसलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
डूंगरपूर जिल्ह्याच्या बिछीवाडा पोलीस स्टेशन परिसरात मोठी कारवाई करण्यात आली त्यात. पोलिसांनी गुजरात बॉर्डरजवळ रतनपूरजवळ नाकेबंदी दरम्यान साडेचार कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. पोलीस अधिकारी मनोज सामरिया यांनी म्हटले की, पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. ते गुजरातमधील रहिवाशी आहेत. आरोपी रणजीत राजपूत पाटनचे राहणारे आहेत. तसेच नितिन पटेल ऊंझाचे रहिवाशी आहेत.
दोघेजण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लपवून घेऊन जात होते. प्राथमिक दृष्ट्या हे प्रकरण हवालाशी रॅकेटशी संबधित असल्याचे बोलले जात आहे. पोलिस दोन्ही आरोपींची चौकशी करीत आहेत.
रतनपुर बॉर्डरवर उदयपूरवरून एका कार आली. या कारची थांबवून तपासणी करण्यात आली. तर सीटच्या खाली गुप्त खात्यात नोटांचे बंडल आढळून आले. कारमध्ये बसलेल्यांना रोख रकमेविषयी विचारले तर त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच नोटासह कारही जप्त केली. नोटांची संपूर्ण मोजणी केल्यानंतर ही रक्कम साडेचार कोटी रुपये इतकी भरली.