नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये कोरोना संसर्गाने हजारो रुग्णांचे प्राण घेतले आहेत. त्यापार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ही राष्ट्रीय आपत्ती आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना गरीबांचा विचार व्हायला हवा. कोरोनाची आकडेवारी पाहता देशात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते.
परंतु अशावेळी गरीबांच्या हातात पैसे द्या. जीवनावश्यक वस्तू खरेदसाठी पैसे द्या, त्यातून त्याचे जीवनमान उंचावेल आणि अर्थव्यवस्थेलाही गती येईल. राष्ट्रीय आपत्ती सारखी ही परिस्थिती आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी मांडलेल्या न्याय योजनेचा विचार करा, असे सोनिया यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय आपत्ती म्हणून गरीबांना मदत करण्याच निर्णय झाला पाहिजे अशी अपेक्षा कॉग्रेसने व्यक्त केली आहे.
देशात लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. लसींना आणिबाणीच्या परिस्थितीमुळे मान्यता द्या, लसीकरण वय नाही तर गरज पाहून द्या असा सल्लाही गांधी यांनी दिला आहे.
कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी आम्ही कमी पडणार नाही. पहिल्या लाटेतदेखील आम्ही नागरिकांना कोणतीही मदत करायला कमी पडलो नाही. जितकी शक्य तितकी मदत करू. केंद्राकडूनही मदतीची अपेक्षा असल्याचे गांधी .यांनी म्हटले आहे.