नवी दिल्ली : गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे २९,४२९ रुग्ण वाढले असून ५८२ रुग्णांना मृत्यू झाला आहे. देशात कोरोना संक्रमितांची संख्या ९ लाख ३६ हजार १८१ वर पोहोचली आहे. सध्या देशात ३ लाख १९ हजार ८४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ५ लाख ९२ हजार ०३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
Spike of 29,429 #COVID19 cases & 582 deaths reported in the last 24 hours in India.
Total positive cases stand at 9,36,181 including 3,19,840 active cases, 5,92,032 cured/discharged/migrated and 24,309 deaths: Ministry of Health pic.twitter.com/Fr3grdVwDs
— ANI (@ANI) July 15, 2020
कोरोना संक्रमितांच्या यादीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अमेरिका, ब्राझील नंतर भारतात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. जर प्रति 10 लाख लोकसंख्येच्या तुलनेत संक्रमित आणि मृत्यू दर पाहिला तर इतर देशांच्या तुलनेत भारत चांगल्या स्थितीत आहे. भारताहून अधिक रुग्ण अमेरिका (3,544,719) आणि ब्राझील (1,931,204) या २ देशांमध्ये आहे.
देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. एक लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दुसऱ्या स्थानावर तमिळनाडू तर तिसऱ्या स्थानावर दिल्ली आहे. यानंतर गुजरात आणि पश्चिम बंगाल यांचा क्रमांक लागतो. या ५ राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.
The recovery rate among COVID-19 patients has increased to 63.20%. The recoveries/deaths ratio is 96.05%:3.95% now: Government of India https://t.co/yhUAYFdUME
— ANI (@ANI) July 15, 2020