मुंबई : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट विरुद्ध (Corona Virus Delta Variant) स्पूतनिक व्ही (Sputnik V) लस इतर लसींच्या तुलनेत अधिक प्रभावशाली असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. याबाबतची माहिती स्पूतनिक व्हीच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन देण्यात आली आहे. "या अभ्यासानुसार भारतात पहिल्यांदा आढळलेल्या डेल्टा व्हेरियंट विरुद्ध स्पूतनिक व्ही प्रभावशील आहे" असं या ट्विटमध्ये म्हटलंय. (Sputnik V is more efficient against the Delta variant of corona virus)
BREAKING | RDIF: “#SputnikV is more efficient against the Delta variant of coronavirus, first detected in India than any other vaccine that published results on this strain so far - the Gamaleya Center study submitted for publication in an international peer-reviewed journal.” pic.twitter.com/XrwnGNhiNE
— Sputnik V (@sputnikvaccine) June 15, 2021
स्पुतनिक व्ही लस कोरोना विरुद्ध 91.56 टक्के प्रभावशील असल्याचं म्हटलं जात आहे. जगभरातील 67 देशांमध्ये स्पुतनिक लशीला अधिकृतरित्या परवानगी देण्यात आली आहे. 10 जूनला बहरीनच्या आरोग्य मंत्रालयाने लसीकरण कार्याक्रमादरम्यान स्पुतनिक लस 94.3% टक्के प्रभावशील असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप स्पुतनिकच्या लसीला आप्तकालीन वापरासाठी परवानगी दिलेली नाही.
याआधीच्या रविवारी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात डॉ रेड्डीज लॅबमधील कर्मचाऱ्यांना स्पुतनिक लस देण्यात आली. पुढील आठवड्यापासून स्पुतनिक लस अपोलो रुग्णालयात उपलब्ध होणार असल्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
Mucermycosis : लहान मुलांना सर्वाधिक धोका; ५ महिन्यांच्या चिमुकलीने गमावला जीव
वॅक्सीन घेतल्यानंतर ताप आला तर नेमकं काय समजायचं? साईड इफेक्टच्या बाबतीत काय म्हणतेय स्टडी