Staff Selection Bharti: अनेकजण भाषांतर करुन घरबसल्या चांगली कमाई करतात. पण यातील अनेकजण याच व्यवसायात चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. नोकरी असल्यावर दर महिन्याला ठराविक पगार आणि इतर सुविधा मिळतात. त्यामुळे तुम्हीदेखील भांषातरकाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये भाषांतरकाराची विविध पदे भरली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइट नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
स्टाफ सिलेक्शन भरती अंतर्गत ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटरची एकूण 312 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.कनिष्ठ हिंदी भाषांतरकार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 30 वर्षे इतकी आहे. उमेदवारांचा जन्म 2 ऑगस्ट 1994 ते 1 ऑगस्ट 2006 दरम्यान आहे.कनिष्ठ हिंदी भाषांतरकार पदासाठी उमेदवारांची निवड विविध चाचण्यांद्वारे होईल. यामध्ये सर्वप्रथम कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा होईल. यामध्ये उमेदवारांचे हिंदी आणि इंग्रजी भाषांतर कौशल्य तपासले जाणार आहे.
25 ऑगस्ट 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर 26 ऑगस्ट ही ऑनलाइन शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 4 आणि 5 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत आपल्या अर्जात बदल करु शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद केला जाईल, याची नोंद घ्या.
आयबीपीएस भरती अंतर्गत आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत. या विविध पदांच्या एकूण 896 रिक्त जागा भरल्या जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. आयबीपीएस भरती अंतर्गत आयटी अधिकारीच्या एकूण 170 रिक्त जागा भरल्या जातील. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतन 4 वर्षे इंजिनीअरिंग/टेक्नोलॉजी डिग्री/पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्र अधिकारीची एकूण 346 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून 4 वर्षांची डिग्री (पदवी) असणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून 21 ऑगस्ट 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 त 30 वर्षांच्या आत असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण उमेदवारांकडून 850 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. तर मागासवर्गीय उमेदवारांकडून 175 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे.