Stocks in News | आज कोणते स्टॉक्स असतील चर्चेत? जाणून घ्या अनिल सिंघवी यांचे विश्लेषण

शेअर बाजारात खरेदी करण्यापूर्वी, त्या स्टॉकची यादी एकदा पाहणे आवश्यक आहे. जे दिवसभर ऍक्शनमध्ये असू शकतात.

Updated: Dec 6, 2021, 09:42 AM IST
Stocks in News | आज कोणते स्टॉक्स असतील चर्चेत? जाणून घ्या अनिल सिंघवी यांचे विश्लेषण

मुंबई : शेअर बाजारात खरेदी करण्यापूर्वी, त्या स्टॉकची यादी एकदा पाहणे आवश्यक आहे. जे दिवसभर ऍक्शनमध्ये असू शकतात. झी बिझनेसचे संपादक अनिल सिंघवी अनेक एक्सपर्ट्सशी बोलून अशा शेअर्सची माहिती देत असतात, जे शेअर बातम्यांच्या आधारे ऍक्शनमध्ये दिसू शकतात.

जर तुम्ही आज शेअर बाजारात खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, कोणत्या शेअर्समध्ये ऍक्शन दिसू शकते. ते पाहा...

आज हे ट्रिगर्स असतील महत्वाचे

बँकिंग आणि NBFC च्या शेअरवर नजर ठेवा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) एमपीसी बैठक आजपासून सुरू होत आहे, जी 8 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

कोल इंडियाच्या शेअर्समध्ये ऍक्शन दिसू शकते. आज प्रति शेअर 9 रुपये लाभांशाची एक्स तारीख आहे.

तेगा इंडस्ट्रीजच्या IPO शेअरमध्येही ऍक्शन दिसू शकते. हा IPO आतापर्यंत 219.04 पट सबस्क्राईब झाला आहे. त्याची किंमत 443-453 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

आनंद राठी IPO दुसऱ्या दिवशी 3.02 पट सबस्क्राईब झाला. त्याची किंमत 530-550 रुपयांच्या दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.

टेक महिंद्राच्या शेअरमध्येही वोलॅटिलीटी येऊ शकते.  Activus Connect हे Activus Connect PR चे अधिकग्रहन आहे. $62 दशलक्ष मध्ये अधिग्रहन होईल.

NMDCच्या स्टॉकमध्ये ऍक्शनमध्ये दिसू शकते. 9.01 प्रति शेअर अंतरिम डिव्हिडंड मंडळाने मंजूर केला आहे.

IGL चा स्टॉक चर्चेत असू शकतो. दिल्ली, हरियाणा, राजस्थानमध्ये CNG च्या किमतीत 1 रुपयांनी वाढ झाली आहे.

Vodafone Idea चा स्टॉकवर देखील नजर राहील. दूरसंचार विभागाकडून बँक गॅरंटी परत मिळाल्याचे वृत्त कंपनीने फेटाळून लावले आहे.

Cheviot च्या स्टॉकमध्ये ऍक्शन दिसू शकते. अडीच लाख शेअर्सच्या बायबॅकला बोर्डाची मान्यता मिळाली आहे. रेकॉर्ड डेट 17 डिसेंबर ठेवण्यात आली आहे.

Lupin चा स्टॉकदेखील चर्चेत आहे. कंपनीने ब्राझीलच्या BIOMM SA सोबत करार केला आहे.