मुलगा रडायचा, दूध विकत घेण्याइतके पैसे नव्हते; आज 800 कोटी अन् दूध कंपनीचे मालक

Vijay Kedia Success Story: शेअर मार्केटमध्ये 1992 ची प्रसिद्ध बुल रन आली. अनेक गुंतवणूकदारांनी यामध्ये भरपूर पैसा कमावला. विजय केडिया हे देखील त्यापैकी एक होते.

Updated: Oct 10, 2023, 04:10 PM IST
मुलगा रडायचा, दूध विकत घेण्याइतके पैसे नव्हते; आज 800 कोटी अन् दूध कंपनीचे मालक title=

Vijay Kedia Success Story: बालपणी आर्थिक अडचणींचा सामना केल्यानंतर परिस्थितीशी झुंजणारे पुढे जाऊन अनेकांसाठी उत्तम उदाहरण बनतात. गुंतवणूकदार विजय केडिया यापैकीच एक आहेत. कोलकात्याच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या केडियाचे वडील स्टॉक ब्रोकर होते. पण केडिया दहावीत असताना वडिलांचे निधन झाले. त्यात ते नापास झाले. वडील गेल्यानंतर उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते. घरी अठरा विश्व दारिद्र्य होते. पण त्यांनी अविरत मेहनत घेतली. नशिबाने त्यांच्या पायाखाली लोळण घेतली. 

विजय केडिया यांनी कसेतरी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि शेअर बाजारात ट्रेडींग करण्यास सुरुवात केली. मिळालेला पगार घरी खर्चाला द्यावा लागायचा. दरम्यानच्या काळात त्यांनी लग्न केले. एक बाळही झाले. एका छोट्या खोलीत 6 जणांचा परिवार राहू लागला. पण विजय यांना आपल्या मेहनतीवर विश्वास होता. पण परिस्थिती अजूनही त्यांची परीक्षा घेत होती. 

शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानंतर विजय केडिया यांच्याकडे आपल्या मुलाचे पोट भरण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते. एके दिवशी मुल भुकेने रडत होते. विजयच्या पत्नीने त्याला दुधाचे पॅकेट आणण्यास सांगितले. त्यावेळी दुधाच्या पाकिटाची किंमत 14 रुपये होती. पण त्यांच्या खिशात इतके पैसेही नव्हते. त्यावेळी विजय आपल्या मुलाला रडताना पाहत राहिले. बायकोने कशीतरी घरात ठेवलेली नाणी एकत्र करुन दूध घेतले. ही घटना विजय केडिया यांच्या मनात कायमची कोरली गेली.  यानंतर 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला विजय केडिया यांनी कोलकाता सोडले आणि मुंबईला आपले घर बनवले. 

शेअर मार्केटमध्ये 1992 ची प्रसिद्ध बुल रन आली. अनेक गुंतवणूकदारांनी यामध्ये भरपूर पैसा कमावला. विजय केडिया हे देखील त्यापैकी एक होते. त्यांनी कोलकाता येथून पंजाब ट्रॅक्टरचे शेअर्स आणले होते, ज्याची किंमत 35 हजार रुपये होती. बुल रन दरम्यान त्याची किंमत पाच पट वाढली. त्यांनी ते विकले आणि ACC चे शेअर्स विकत घेतले. वर्षभरात त्या शेअर्सची किंमत 10 पट वाढली. त्यांच्या आयुष्यातील हे मोठे यश होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत घर घेतले आणि कुटुंबाला कोलकाताहून मुंबईत आणले.

14 रुपयांचा बदला 

विजयने 2009 मध्ये एका दूध कंपनीचे शेअर्स खरेदी केले आणि ते आपल्या पत्नीला भेट दिले. त्याने आपल्या पत्नीची माफी मागितली आणि. हा 14 रुपयांचा बदला आहे जे मी त्यावेळई गोळा करू शकलो नाही. 2022 मध्ये त्यांनी सियाराम मिल्क कंपनीचा 1.1 टक्के हिस्सा विकत घेतला. आज विजय केडिया 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत.