Railway Station Free WiFi : देशभरात भारतीय रेल्वेचं जाळं परसरलं आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वेमार्फत (Indian Railway) प्रवाशांना अनेक सुविधा पुरवल्या जातात. यापैकीच एक सुविधा म्हणजे मोफात वाय-फाय (Free WiFi). देशातल्या जवळपास प्रत्येक रेल्वे स्टेशनवार प्रवाशांसाठी मोफत वाय-फायची सुविधा दिली जाते. मोफत वाय-फायची सुविधा स्मार्टफोन (Smartphone) असलेला प्रत्येक प्रवासी वापरु शकतो. पण हा वाय-फाय सुरक्षित आहे का हे बऱ्याच जणांना माहित नसतं. भारतीय रेल्वने प्रवास करणाऱ्या आणि मोफत वाय-फाय वापरणाऱ्या प्रवाशांसाठी हे माहित करुन घेणं आवश्यक आहे.
रेल्वेचं वाय-फाय असुरक्षित?
एन्क्रिप्टेड नेटवर्क : रेल्वे स्टेशनवर मिळवणारं मोफत वाय-फाय हे ओपन नेटवर्क असतं. याचा अर्थ हॅकर्स अगदी सहज तुमचा डेटा पाहू शकतात. यात तुमचं पासवर्ड, बँकिंगची माहिती तसंच इतर संवेदनशील माहितीचा समावेश असू शकतो.
मालवेयरचा धोका : हॅकर सार्वजनिक नेटवर्कवर मायवेअर म्हणजे व्हायरस पसरवू शकतात. ज्यामुळे तुमचं डिव्हाईस संक्रिमत होऊ शकतं आणि तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते.
फिशिंग हल्ले : हॅकर्स वैध वेबसाइट्सची नक्कल करणाऱ्या फिशिंग वेबसाइट्स वापरून तुमची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. जेव्हा तुम्ही या वेबसाइट्सवर लॉग इन करता तेव्हा तुम्ही नकळत तुमची माहिती हॅकर्सला देता.
आपली सुरक्षा कशी कराल
वीपीएनचा वापर करा : वीपीनद्वारे (वर्चुअल प्राइवेट नेटवर्क) तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित करु शकता. ज्यामुळे हॅकर्ससाठी डेटा चोरणं अवघड होऊ शकतं. जेव्हा तुम्ही सार्वजनिक वाय-फायचा वापर करता त्यावेळी वीपीएनचा वापर करणं एक चांगली सवय आहे.
मजबूत पासवर्डचा वापर : सर्व ऑनलाईन अकाऊंट्ससाठी मजबूत पासवर्डचा वापर करा. शक्यतो वैयक्तिक माहिती, जन्म तारिख, पत्ता यांचा वापर पासवर्डसाठी करु नका.
फायरवॉल इनबेल करा: आपल्या डिव्हाइसवर फायरवॉल इनेबल करा. ज्यामुळे अनधिकृत प्रवेशास प्रतिबंध करण्यात मदत होते.
अँटी-व्हायरस आणि अँटी-मालवेयर सॉफ्टवेयरचा वापर करा : तुमच्या डिव्हाईसमध्ये अँटी-व्हायरस आणि अँटी-मालवेयर सॉफ्टवेयरचा वापर करा
संवेदनशील माहिती शेअर करणं टाळा : सार्वजनिक वाय-फायचा वापर करत असताना ऑनलाइन बँकिंग किंवा खरेदी यासारख्या गोष्टी टाळा
अज्ञात लिंकवर क्लिक करू नका: संशयास्पद किंवा अज्ञात लिंकवर क्लिक करणे टाळा, विशेषतः ईमेल किंवा सोशल मीडियावरच्य लिंक उघडू नका.