TMC च्या या खासदार एका पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत

नुसरत जहाँ यांची ही पोस्ट व्हायरल

Updated: Apr 28, 2021, 10:15 PM IST
TMC च्या या खासदार एका पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत title=

कोलकाता : बांग्ला अभिनेत्री आणि टीएमसीच्या खासदार नुसरत जहाँ अभिनय आणि राजकारण या दोघी क्षेत्रातील कामांबद्दल चर्चेत असतात. आयुष्यात इतक्या व्यस्त असूनही नुसरत जहाँ सोशल मीडियावर सतत आपल्या चाहत्यांशी जोडलेल्या असतात. नुसरत जहाँचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. नुसरत जहाँची एक पोस्ट सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.

नुसरत जहाँ यांनी देशात पसरलेल्या कोरोना महामारीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'आता आम्ही आयसोलेशनमध्ये आहोत, म्हणून आम्ही पुन्हा एकत्र झालो आहोत, कोणीही मिसिंग नाही ...'

नुसरत जहाँ यांनी 19 जून 2019 रोजी उद्योजक निखिल जैनशी लग्न केले. लग्नानंतर नुसरत जहाँ बरीच ट्रोल झाल्या.