Petrol-Diesel Price : 'या' जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल, जाणून घ्या आजचे दर

मेघालयात गेल्या दिवसभरात पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Diesel Price) दरात दीड रुपयांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला.

Updated: Sep 29, 2022, 08:57 AM IST
Petrol-Diesel Price : 'या' जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल, जाणून घ्या आजचे दर  title=

Petrol Diesel Price  : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण सुरूच आहे. असे असतानाही पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) चार महिन्यांपासून स्थिर आहेत. दरम्यान चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्र आणि मेघालय वगळता इतर सर्व राज्यांमध्ये तेलाच्या किमतीत बदल झाला होता. त्यावेळी मोदी सरकारने उत्पादन शुल्कात कपात करून जनतेला मोठा दिलासा दिला होता. (today Petrol Diesel Price on 29 September 2022)

कच्च्या तेलाचे आजचे दर

मेघालयात गेल्या दिवसभरात पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Diesel Price) दरात दीड रुपयांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला. त्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 90 च्या खाली आहे. गुरुवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $81.69 वर पोहोचली. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 88.87 वर घसरल्याचे दिसून आले. यापूर्वी 22 मे रोजी केंद्रातील मोदी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल सहा रुपयांनी स्वस्त झाले आहे. यानंतर लगेचच काही राज्य सरकारांनीही व्हॅट कमी केला.   

तर 'या' जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल

महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल परभणी जिल्ह्यात विकलं जात आहे. परभणीत सध्याचा पेट्रोलचा दर 109.41 रुपये आणि डिझेलचा दर 95.81 रुपये प्रति लिटर आहे. तर, राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 106.04 रुपये प्रति लिटर असून डिझेलचा दर 92.59 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 105.84 रुपये आणि डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.01 रुपये प्रति लिटर इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 108 रुपये आणि डिझेलचा दर 95.96 प्रति लिटर इतका आहे.  

पाहा पेट्रोल-डिझेलच्या किमती 

शहरं पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये
दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये
चेन्नई 102.74 रुपये 94.33 रुपये
कोलकाता 106.03 रुपये 92.76 रुपये

इंधन दर कसे पाहाल? 

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price) मोबाइलवरही इंधन दर पाहता येतील. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.