Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर

Petrol-diesel Price : कच्च्या तेलाच्या किंमती $ 90 च्या पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. बुधवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $88.64 वर पोहोचली. 

Updated: Oct 12, 2022, 07:47 AM IST
Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर  title=

Petrol-Diesel Price Today 12th October :  कच्च्या तेलाची विक्रमी पातळी घसरल्यानंतर त्यात वाढ दिसून आली. मात्र आता पुन्हा कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरणीचे चक्र सुरूच आहे. किमतीत विक्रमी घसरण झाल्यानंतर ओपेक देशांनी (OPEC) उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पुन्हा एकदा क्रूडच्या किंमतीत (crude price) वाढ झाली आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा घसरण सुरू आहे.

किंमती बऱ्याच काळापासून समान पातळीवर

पेट्रोल-डिझेलचे (petrol-diesel rate) दर बऱ्याच दिवसांपासून समान पातळीवर आहेत. सुमारे साडेचार महिन्यांपूर्वीच्या दरावर पेट्रोल (petrol price) कायम आहे. क्रूडच्या किमतीत प्रचंड चढ-उतार होऊनही पेट्रोलमध्ये कोणताही बदल झालेला नाही. 22 मे 2022 रोजी मोदी सरकारने तेलाच्या किंमतीवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. त्यावेळी देशभरात पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल पाच रुपयांनी स्वस्त झाले होते.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात

यानंतर महाराष्ट्र आणि मेघालयमध्ये तेलाच्या किमतीत बदल झाला. अलीकडेच तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) दरात कपात केली आहे. मंगळवारी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 88.64 पर्यंत घसरली. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 93.75 च्या पातळीवर दिसले.

शहर आणि तेलाच्या किमती (Petrol-Diesel Price on 12th october)

- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाणून घेण्यासाठी तेल कंपन्या एसएमएसद्वारे किंमत तपासण्याची सुविधा देतात. दर तपासण्यासाठी, इंडियन ऑइलच्या (IOC) ग्राहकाला RSP <डीलर कोड> लिहून 9224992249 वर पाठवावा लागेल. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर एसएमएस करतात आणि BPCL ग्राहक RSP <डीलर कोड> 9223112222 वर SMS करतात.