कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या CSIF जवानाला सोन्याची अंगठी पाठवणार; 'या' पक्षाने केली घोषणा

भाजपाची नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला (Kangana Ranaut) कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफ (CISF) जवानाला सोन्याची अंगठी बक्षीस म्हणून पाठवण्याची घोषणा करण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 9, 2024, 03:40 PM IST
कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या CSIF जवानाला सोन्याची अंगठी पाठवणार; 'या' पक्षाने केली घोषणा title=

भाजपाची नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला (Kangana Ranaut) कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफ (CISF) जवानाला सोन्याची अंगठी बक्षीस म्हणून पाठवण्याची घोषणा करण्यात आली आहे. टीडीपीके पक्षाने आपण सीयाएसएफ जवान कुलविंदर कौरला सोन्याची अंगठी पाठवण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं आहे. या सोन्याच्या अंगठीत पेरियार यांचा फोटो असणार आहे. दरम्यान या घटनेनंतर महिला जवानाला निलंबित करण्यात आलेलं आहे.

टीडीपीचे महासचिव रामकृष्णन यांनी शनिवारी सांगितलं की, "आम्ही कुलविंदर कौरला 8 ग्रॅम सोन्याची अंगठी पाठवण्याचा विचार करत आहोत. सोमवारी अंगठी पाठवली जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी उभी राहिल्याबद्दल तिचा हा सन्मा केला जाणार आहे".

पुढे त्यांनी म्हटलं की, "आम्ही कुलविंदर कौरच्या घऱच्या पत्त्यावर सोन्याची अंगठी पाठवणार आहोत. जर कुरिअर सर्व्हिसने सोन्याची अंगठी स्विकारली नाही, तर आम्ही आमच्या एखाद्या सदस्याला ट्रेन किंवा विमानाने तिच्या घरी पाठवू. कुलविंदर कौरला सोन्याच्या अंगठीसह, पेरियार यांच्याशी संबंधित काही पुस्तकंही दिली जाणार आहेत".

नेमकं काय झालं होतं?

हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून निवडणूक जिंकणारी कंगना रणौत दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचली होती. यावेळी सीआयएसएफ जवान कुलविंदर कौरने कंगना रणौतच्या कानाखाली लगावली. या घटनेचा व्हिडीओ काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओत कंगना चेक इन काऊंटवर पोहोचल्यानंतर शाब्दिक वाद होताना दिसत आहे. पण व्हिडीओत कानाखाली लगावतानाचा क्षण कैद झालेला नाही. 

या घटनेनंतर कंगना रणौतने व्हिडीओ जारी करत आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं. तसंच पंजाबमधील वाढत्या दहशतवादावर चिंता व्यक्त केली होती. "मी सुरक्षित आहे. मी पूर्णपणे ठीक आहे. सुरक्षा तपासणीच्या वेळी ही घटना घडली. महिला सुरक्षारक्षकाने मी तेथून बाहेर पडण्याची वाट पाहिली. नंतर तिने बाजूने येऊन माझ्यावर हात उचलला. मी विचारलं की मला का मारलं? ती म्हणाली, 'मी शेतकऱ्यांचे समर्थन करते'. मी सुरक्षित आहे, पण पंजाबमधील वाढत्या दहशतवादाची मला चिंता आहे. ते आपण कसं हाताळणार आहोत?", असं कंगनाने व्हिडीओत सांगितलं होतं. 

कंगनाला कानशिलात लगावणारी कॉन्सटेबल कुलविंदर कौरने तिने शेतकऱ्यांचा अनादर केल्याने कानाखाली लगावल्याचं सांगितलं. "कंगनाने 100 रुपये घेऊन आंदोलन करत असल्याचं म्हटलं होतं. ती तिथे जाऊन बसणार आहे का? माझी आई तिथे आंदोलनाला बली होती. त्यावेळी तिने हे विधान केलं होतं," असं तिने सांगितलं होतं. दरम्यान कुलविंदर कौरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

कंगनाने सीआयएसएफ जवानाला समर्थन देणाऱ्यांना सुनावलं

शनिवारी कंगनाने सीआयएसएफ जवानांना पाठिंबा देणाऱ्यांना उद्देशून एक मोठी नोट शेअर केली. "प्रत्येक बलात्कारी, खुनी, किंवा चोराकडे गुन्हा करण्यासाठी नेहमीच एक मजबूत भावनिक, शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक कारण असते, कोणताही गुन्हा विनाकारण घडत नाही, तरीही त्यांना दोषी ठरवून तुरुंगात टाकले जाते. जर तुम्ही गुन्हेगाराच्या भावनिक कारणाशी सहमती दर्शवत असाल तर देशाच्या सर्व कायद्यांचे उल्लंघन करत आहात," असं तिने लिहिलं होतं.