ऐ भाऊ जरा सांभाळून! Video पाहून हृदयाचा ठोकाच चुकला

हे स्टंट करताना तरुण अनेक वेळा स्वत:चा जीव धोक्यात घालताच शिवाय इतरांचा जीवही धोक्यात घालतात. 

Updated: Aug 20, 2022, 04:29 PM IST
ऐ भाऊ जरा सांभाळून! Video पाहून हृदयाचा ठोकाच चुकला title=
trending video risk of losing life due to stunts on road viral video in social media in marathi

Trending video : नजर हटी, दुर्घटना घटी या म्हणीचा प्रयत्य जीवनात अनेक वेळा येतो. रस्त्याने जाताना जर आपली नजर दुसरीकडे गेली आणि आपल्या अपघात झाला नाही तर नवलंच. सोशल मीडियावरही आपण अनेक अपघाताचे व्हिडीओ पाहत असता. ज्यात अनेक वेळा दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा त्या अपघातग्रस्त व्यक्तीला मिळते. शिवाय आपली नजर चुकली आणि दुर्घटना घडली असे व्हिडीओ पण आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले आहेत. 

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुण पिढी जीवघेणे स्टंट करत असतात. हे स्टंट करताना तरुण अनेक वेळा स्वत:चा जीव धोक्यात घालताच शिवाय इतरांचा जीवही धोक्यात घालतात. एक छोटीशी चुक या स्टंट करणाऱ्या किती महागात पडू शकते याचा अंदाजही त्यांना येत नाही असा प्रश्न व्हिडीओ पाहून पडतो. 

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे तो पाहून आपल्या हृदयाचे ठोके चुकतात. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.या व्हिडीमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती खुर्चीवर बसून काही मुलांसोबत गप्पा मारत असतो. त्या मुलाच्या हातात पाण्याची बाटलीही असते. (trending video risk of losing life due to stunts on road viral video in social media in marathi)

त्या खुर्जीवर बसलेल्या मुलाच्या मागून बाईकवर एक व्यक्ती सुसाट वेगाने त्याचा दिशेने येतो. पुढे जे होतं ते पाहून अंगावर काटा येतो, बाईकस्वार दुचाकीचे मागील चाक हवेत उचलले आणि मुलाच्या हातात धरलेल्या बाटलीचे झाकण उघडलं. 

जर हा स्टंट करताना जरा तरी चुक झाली असती तर तरुणाचा जीव गेला असता. फक्त प्रसिद्धीसाठी अशाप्रकारचे स्टंट करुन जीव धोक्यात घालने कितपत योग्य आहे. अवघ्या काही सेकंदांचा या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्यूज मिळाले आहेत. तर कमेंट सेक्सशनमध्ये यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@h2r_saifali_bikelover)