Video : सोन्याचे दागिने घालताना सावधान! भरदिवसा अशी होवू शकते लूट ?

Chain Snatching : आता तर चोर भरदिवसा रस्त्यात चोरी करत आहेत. एकट्या-दुकट्या महिलांना लूटत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

Updated: Aug 28, 2021, 08:16 AM IST
Video : सोन्याचे दागिने घालताना सावधान! भरदिवसा अशी होवू शकते लूट ? title=

मुंबई : Chain Snatching : सध्या कोरोनाचा काळ आहे. कोरोनाचे (Coronavirus) संकटामुळे अनेक जण आर्थिक संकटात आहेत. यातच चोऱ्यांच्या घटनात वाढ झाली आहे. आता तर चोर भरदिवसा रस्त्यात चोरी करत आहेत. एकट्या-दुकट्या महिलांना लूटत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. भररस्त्यात दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलांना चोरट्याने सगळ्यांसमोर लुटले आणि दुचाकीवरुन पळ काढला. (Two bike-borne miscreants snatch chain)

मध्य प्रदेशात साखळी चोरट्यांनी (Madhya Pradesh Chain Snatching) दुचाकी रोखत महिलेकडून सोनसाखळी हिसकावली आणि नंतर फरार झालेत. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये दिवसाढवळ्या होणाऱ्या लुटीचा हा व्हिडिओ समोर आला आहे. (Two bike-borne miscreants snatch chain from a woman in Gwalior) ज्यात दोन दुचाकीस्वार चोरांनी स्कूटीवर जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातीत सोनसाखळी खेचली आणि घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी चोरट्याने चाकूचा धाक दाखवून महिलेला दुचाकीवरुन खाली उतरु दिले आहे.