Shocking News : जन्माला येणारं बाळ मुलगा(Boy) असेल की मुलगी(girl) हे कुणाच्या हातात नसतं. स्त्री भृण हत्या(Female foeticide) रोखून मुलीच्या जन्माचा आनंदाने स्वीकार व्हावा यासाठी जनजागृतीसह सरकारतर्फे विविध प्रोत्साहनपर योजना देखील राबवल्या जातात. मात्र, आजही आपल्या समाजात मुलगी नकोशी असल्याचे चित्र पहायला मिळते. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर बापाने तिच्यासह हैवानी कृत्य केले आहे. मुलगी झाली म्हणून हा बाप नवजात बाळाच्या तोंडावर थुंकला(UP Father Split on Daughter Face). त्याचे हे कृत्य पाहून इतर लोकांनी त्याला हटकले असता त्याने सर्वांशी हुज्जत घातली.
हा हैवान पिता उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील राहणारा आहे. माधव असे या नराम पित्याचे नाव आहे. माधवच्या पत्नीने लालगंज येथील रुग्णालयात बाळाला जन्म दिला. पत्नीच्या प्रसुतीनंतर तो तिला भेटण्यासाठी रुग्णालायत आला होता. मुलगी झाल्याचे समजताच तो भयंकर चिडला. बायकोने त्याला बाळ दाखवले असता तो या नवजात बाळाच्या तोंडावर थुंकला. एवढ्यावरच न थांबता त्याने या बाळाला मारायला सुरुवात केली. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, इतर रुग्ण धावत यांच्यावळ आले. मात्र, माधवचे कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.
सर्वांनी माधवला असे करण्यापासून अडवले असता त्याने सर्वांशी हुज्जत घालत रुग्णालयात मोठा गोंधळ घातला. हा प्रकार पाहून रुग्णालय प्रशासनाने थेट पोलिसांना पाचारण केले. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या नराधम पित्याला ताब्यात घेतले. मुलगी झाली म्हणून या बापाने घातलेला गोंधळ पाहून रुग्णालयात उपस्थित असलेल्या सर्वांनाच धक्का बसला.
माधवच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार आधी या दोघांना चार मुली आहेत. पाचवी देखील मुलगी झाल्याने माधव नाराज झाला होता. यामुळे रुग्णालायत भेटायला आल्यानंतर त्याने पत्नीशी हुज्जत घालत तो नवजात बाळाच्या तोंडावर थुंकला. बाळाच्या तोंडावर त्याने चापट देखील मारल्या.
समाजात मुलींचा जन्मदर घटला आहे. आजही वंशाचा दिवा म्हणून मुलगाच जन्माला यावा अशी अनेकांची इच्छा असते. यातूनच जन्माला येण्याआधीच मुलींचा बळी घेतला जातो. सरकारने गर्भ लिंग निदान चाचणीवर बंदी आणली आहे, यामुळे स्त्री भृण हत्यांवर रोख लागला आहे. मात्र, असा परिस्थितीत जन्माला येणाऱ्या मुलींना नकोशी म्हणत आई-वडिलच तिच्यासह दुजाभाव करता. यामुळे बऱ्याच मुलींना घरातूनच विचित्र वागणूक मिळते.