कोरोना : अमेरिकेतील वैज्ञानिकांच्या दाव्यामुळे चिंता वाढल्या

अमेरिकेतील वैज्ञानिकांचा नवा दावा

Updated: Apr 6, 2020, 08:41 PM IST
कोरोना : अमेरिकेतील वैज्ञानिकांच्या दाव्यामुळे चिंता वाढल्या

मुंबई : जगभरात एकीकडे कोरोनाने थैमान घातलं असताना अमेरिकेतील वैज्ञानिकांनी केलेल्या आणखी एका दाव्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. कोरोना व्हायरसवर अजूनही लस विकसित नसल्याने त्यावर नियंत्रण मिळवणं कठीण होत चाललं आहे. कोरोना आता महामारी बनत चालली आहे. ज्यामुळे संगळ्याचं देशांच्या चिता वाढल्या आहेत.

अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी असा इशारा दिला आहे की, कोरोना विषाणू हळूहळू हंगामी रोगाचे रूप धारण करू शकतो. अमेरिकेतील संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ अँथनी फौची यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूचे नियंत्रण संपूर्ण जगात अशक्य आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ इन्स्टिट्यूट मधील संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञांनी म्हटलं की, अमेरिकेत पुढील हंगामात पुन्हा कोरोना विषाणूचा संसर्ग पसरु शकतो.

फौची म्हणाले की कोरोना परत येण्याच्या शक्यतेमुळेच अमेरिका वेगाने स्थिती मजबूत करीत आहे. ते म्हणाले की, लस विकास आणि सर्व उपचारांवर अमेरिका क्लिनिकल चाचण्या घेत आहे.

फौची म्हणाले, जर कोरोना पुन्हा उदभवला, तर आमच्याकडे किमान ते थांबवण्याचे उपाय असतील. फौची यांनी याआधीच संगितले होते की अमेरिका 12 ते 18 महिन्यांत कोरोना विषाणूची लस तयार करेल.

डॉ. फौची यांनी असा दावा केला आहे की, अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे एक लाखाहून अधिक मृत्यू होऊ शकतात. त्यांनी सावध केले की, जे लोक घरात राहण्याचे आदेश असे लोकं स्वत: देशापेक्षा अधिक धोक्यात आहेत

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, सध्या कोरोना विषाणूची 40 लसींची तपासणी करण्यात येत आहे. यापैकी अनेक लसी मानवाच्या चाचणी टप्प्यावर पोहोचली आहेत.