Crime News : गावातील बेपत्ता झालेल्या मुलीचा दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 17 वर्षाची मुलगी दुपारी 3 च्या सुमारास बेपत्ता झाली होती, गावातील लोकांनी तपास केल्यावर तिचा मृतदेह शेजारील गावामध्ये ऊसाच्या शेतात सापडल्याने खळबळ उडाली आहे. (Teenager's Body Found In Sugarcane Field)
अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती ज्यावेळी तिचा मृतदेह सापडला त्यावेळी तिथे एक ओढणीही सापडली. नराधमांनी तिच्यावर बलात्कार करून तिची ओढणीने गळा दाबून हत्या केली. ही घटना उत्तर प्रदेशमधील आजमगढच्या सीवान परिसरातील अतरौलिया या गावातील आहे. मृत मुलीच्या घरच्यांनी गावातील एका तरूणावर संशय व्यक्त केला आहे.
पोलिसांच्या युनिटने आणि श्वान पथकानेही घटनेच्या ठिकाणी जात पाहणी केली आहे. ज्या ठिकाणी मृतदेह मिळाला तिथून काही पुरावेही गोळा करण्यात आले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, गावामधून मुलगी बेपत्ता होऊन दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह मिळत असेल तर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली जाते म्हणजे नराधमांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही?, असा सवाल उपस्थित होत आहे.