त्याने तिला दिली जादू कि झप्पी.. कडाकडा मोडली तिची 3 हाडं..द्यावी लागली भरपाई

तिच्या सहकाऱ्याने तिला फार जोरात मिठी मारली. ज्यामुळे तिच्या छातीची हाडं मोडली. या महिलेने आता दंड भरपाईची मागणी केली आहे

Updated: Nov 3, 2022, 04:01 PM IST
त्याने तिला दिली जादू कि झप्पी.. कडाकडा मोडली तिची 3 हाडं..द्यावी लागली भरपाई  title=

Rib Crushing hug viral trending: आपण जेव्हा खूप दुःखी असतो एकाकी असतो अशा वेळी आपल्या जवळच्या कुणी व्यक्तीने आपल्याला मिठी मारली तरी आपल्याला दिलासा मिळतो.

संजय दत्त च्या मुन्नाभाई सिनेमात सुद्धा जादू कि झप्पी किती महत्वाची असते हे सांगण्यात आला आहे. पण मिठी मरण एका मुलाच्या आणि मुलीच्या आयुष्यात खूप महागात पडलं आहे.

 मुलगी तर थेट रुग्णालयात पोहचली आणि मुलाला भरावा ;लागला लाखोंचा दंड ! ही घटना चीनची आहे आणि चीनी महिलेने आपल्या सहकाऱ्यावर केस ठोकली आहे.  तिच्या सहकाऱ्याने तिला फार जोरात मिठी मारली. ज्यामुळे तिच्या छातीची हाडं मोडली. या महिलेने आता दंड भरपाईची मागणी केली आहे. (Rib Crushing hug viral trending)

आणखी वाचा: हिवाळा येतोय..ताबडतोब थांबवा हे स्किन प्रोडक्टस..नाहीतर त्वचा होईल खराब 

माहितीनुसार ही घटना मे 2021 मध्ये घडली होती. चीनच्या हुनान प्रांतातील यूयांग शहरातील महिला तिच्या ऑफिसमध्ये तिच्या एका सहकाऱ्यासोबत बोलत होती. इतक्यात समोरून तिचा मित्र आला

आणखी वाचा: 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई? preganancy Kit सोबतच्या फोटोतुन धक्कादायक खुलासा

आणि हाय हॅलो केल्यानंतर तिला मिठी मारली  मात्र त्याने मिठी मारताच ती वेदनेने ओरडू लागली , कामादरम्यानही तिला त्रास होऊ लागला होता. डॉक्टरांकडे जाण्याऐवजी घरगुती उपचार तिने करून पहिले  मात्र वेदना वाढल्या असता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने एक्स-रे स्कॅन करून घेतले त्यानुसार, महिलेच्या छातीतील ३ हाडं मोडली होती.  

आणि त्या मित्राला मात्र याची भरपाई द्यावी लागली. (Rib Crushing hug viral trending)