दगडामागे लपून बसला कुत्रा...5 वाघ आले आणि... पाहा व्हिडीओ

5 वाघांमध्ये फसला कुत्रा...पुढे काय झालं पाहा व्हिडीओ

Updated: Oct 14, 2021, 06:09 PM IST
दगडामागे लपून बसला कुत्रा...5 वाघ आले आणि... पाहा व्हिडीओ

मुंबई: असं म्हणतात आजकाल माणसकी फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. माणुसकी प्राण्यांकडून शिकावी असे प्रसंग अनेक वेळा घडतात. काही दिवसांपूर्वी मांजर आणि बिबट्य़ा विहिरीत पडले होते. मात्र त्यांनी एकमेकांवर हल्ला केला नाही. तर आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत राहिले. संकटाचा फायदा बिबट्याने घेतला नाही. असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

वाघ आणि कुत्र्याचा हा व्हिडीओ आहे. कुत्रा आपला जीव वाचवण्यासाठी दगडामागे लपून बसला आहे. मात्र वाघ त्याला पाहातो. एक नाही तर तब्बल पाच वाघ त्याच्या आजूबाजूला येतात. या कुत्र्याला घेरतात. मात्र त्याच्यावर त्यातील एकही वाघ हल्ला करत नाही. कुत्राही आपल्या जीवाला घाबरून मुटकुळं करून पडून राहातो. 

पांढऱ्या रंगाचा वाघ पुढे येऊन त्या कुत्र्यावर माया करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यातील हे अनोखं प्रेम पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. जर एखादा प्राणी वाघाच्या टोळीत एखादा प्राणी अडकला तर असं म्हटलं जातं की तो आता वाघाचा बळी ठरला आहे. 

कधीकधी वाघ प्राण्यांची शिकार न करता त्यांना जीवदान देतात. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा 5 वाघांमध्ये फसल्याचं दिसत आहे. त्यातसा एक वाघ त्या कुत्र्याकडे येतो आणि त्याचा वास घेतो आणि त्याचे डोके कुत्र्याच्या डोक्यावर घासू लागतो. हा व्हिडीओ पाहताना एक क्षण असं वाटतं की आता या कुत्र्याचं काही खरं नाही. मात्र वाघ त्याला जीवदान देतात.