राजधानी दिल्लीही मराठमोळ्या सोनूच्या प्रेमात!

'सोनू तुझा मायावर भरोसा नाई का?', या गाण्याचा दरारा केवळ राज्यातच नव्हे तर, राजधानी दिल्लीतही असल्याचे  दिसून आले आहे. आजवर केवळ आम आदमीच्या ओठावर असलेल्या या गाण्याने आता महाराष्ट्राच्या विधानसभेनंतर थेट राजधानी दिल्लीतही आव्हान दिले आहे.

Updated: Aug 17, 2017, 05:11 PM IST
राजधानी दिल्लीही मराठमोळ्या सोनूच्या प्रेमात! title=

मुंबई : 'सोनू तुझा मायावर भरोसा नाई का?', या गाण्याचा दरारा केवळ राज्यातच नव्हे तर, राजधानी दिल्लीतही असल्याचे  दिसून आले आहे. आजवर केवळ आम आदमीच्या ओठावर असलेल्या या गाण्याने आता महाराष्ट्राच्या विधानसभेनंतर थेट राजधानी दिल्लीतही आव्हान दिले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे सर्वसामान्यांचा नेता अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले. केजरीवाल यांचा काल (बुधवार, १६ ऑगस्ट) वाढदिवस होता. दरम्यान, आम आदमी पक्षाचे माजी नेते आणि दिल्लीतील बागी विधानसभा मतदार संघाचे आमदार कपील मिश्रा यांनी सोनू गाण्यातून केजरीवाल यांची पोलखोल केला आहे. सोनू तुझा मायावर भरोसा नाय का? या गाण्याच्या चालीवर ‘एके तुझे खुद पर भरोसा नहीं क्या…?’, असा सवाल विचारत केजीरवाल प्रशासन आणि आपच्या अनेक नेत्यांवर मिष्कील पद्धतीने आरोप केले आहेत.

दरम्यान, मिश्रा यांनी हे गाणे आपल्या ट्विटर अकाऊंटवर 'AK तेरी कुर्सी गोल' या हॅशटॅगने शेअर केले आहे.