नवऱ्याच्या मृतदेहासमोर नववधू ढसाढसा रडली; हत्येच्या उलगडा होताच सासरकडच्या लोकांची पायाखालची जमीनच सरकली

नवीन लग्न होतं दोघेही आनंदात होते. नातेवाईक, सण म्हणा अशा सर्वच ठिकाणी दोघेही हजेरी लावत होते. 

Updated: May 26, 2022, 06:09 PM IST
नवऱ्याच्या मृतदेहासमोर नववधू ढसाढसा रडली; हत्येच्या उलगडा होताच सासरकडच्या लोकांची पायाखालची जमीनच सरकली title=

मुंबई  : नवीन लग्न होतं दोघेही आनंदात होते. नातेवाईक, सण म्हणा अशा सर्वच ठिकाणी दोघेही हजेरी लावत होते. बायकोच्या हातावरची मेहंदी पण उतरली नव्हती. संपुर्ण कुटूंब आनंदात होते. मात्र एके दिवशी दोघेही पती-पत्नी घराबाहरे गेले. पत्नी घरी आली पण नवरा बेपत्ता झाला.आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या मृत्यूचीच खबर आली. हे पाहून पत्नीसह सर्वांनाचा मोठा धक्का बसला, सर्व आनंदावर विरजण पडले. मात्र पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा कसून तपास केला, त्यावेळी जो आरोपी अटकेत आला ते पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. 

ही घटना आहे, पश्चिम बंगालच्या हुगळीतली. 13 मार्च रोजी बसु कुटूंबातल्या एकमेव मुलगा असलेल्या शुभ्रज्योति बसुचे पुजा या तरूणीसोबत लग्न झाले. धुमधडाक्यात हे लग्न पार पाडलं. दोन्हीकडचं कु़टूंब या लग्नाने आनंदात होत. लग्नाला महिनाही पुर्ण झाला. पती-पत्नी नातेवाईकांना मित्र-मैत्रिणींना जोडीने भेटत होते. त्यामुळे एकंदरीत सर्वचं चांगल चाललं होतं.. 

एके दिवशी पत्नी पुजा ही शुभ्रज्योतिला तिची मैत्रिण शर्मिष्ठाला भेटायला तिच्या घरी घेऊन गेली. शर्मिष्ठाचा पती एका गुन्ह्यात जेलमध्ये असल्याने या तिघांचीच भेट झाली. ही भेट झाल्यानंतर दोघेही घरी परतले. अशाच एके दिवशी दोघ नव जोडपं पुन्हा घराबाहेर पडलं. मात्र यावेळेस फक्त पत्नी पुजाच घरी परतली. नवरा मात्र परतला नाही. त्यामुळे सासरच्यांकडून शुभ्रज्योति बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. 

सासरच्यांच्या तक्रारीपुर्वी पोलिसांना एक धड नसलेली बॉडी सापडली होती. या बॉडीवर एक टॅटू होता. हा टॅटू इतर पोलिस स्टेशनमध्ये पाठवण्यात आला होता. तसेच हा टॅटू शुभ्रज्योतिच्या कुटूंबियांनी ही पाहायला आणि मृतदेहाची ओळख पटली. त्यामुळे शुभ्रज्योतिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते.  

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करायला सुरूवात केली. शुभ्रज्योतिच्या नातेवाईक, मित्र-मैत्रिणींची चौकशी करण्यात आली. शुभ्रज्योतिची पत्नी पुजा हिची सुद्धा चौकशी करण्यात येत होती. मात्र यात पुजा नेहमी वेगवेगळी माहिती द्यायची आणि घाबरलेली दिसायची. त्यामुळे पोलिसांना संशय बळावला होता.  

पोलिसांनी ज्यावेळी कसून तपास केला, पूजाला घटनास्थळी नेऊन घटनेची पुनरावृत्ती करायाला सांगितली. त्यावेळेच घाबरलेल्या पूजाने सर्व गुन्ह्याचा उलगडा केला. 

मैत्रिणीच्या भेटीनंतर काय झालं ?
पत्नी पुजा ही शुभ्रज्योति तिची मैत्रिण शर्मिष्ठाला भेटायला तिच्या घरी घेऊन गेले होते. त्यावेळेस शुभ्रज्योतिला शर्मिष्ठा पहिल्याच भेटीत आवडली होती. त्यामुळे तिच्यामागे हात धूवुन लागता होता. ही गोष्ट शर्मिष्ठाने पुजाला सांगितली. यानंतर पूजाने आपल्या शुभ्रज्योतिला 
शर्मिष्ठापासून दुर रहाण्यास सांगितले. मात्र शुभ्रज्योतिने पूजालाच धमकावले. शुभ्रज्योति शर्मिष्ठासोबत एकतर्फी प्रेम करू लागला होता. 

असा रचला हत्येचा कट 
जेलमध्ये असलेला शर्मिष्ठाचा पती जेलबाहेर आला होता. शर्मिष्ठाने या घटनेची माहिती आपल्या पतीला दिली होती. तसेच पू़जाही आपल्या पतीच्या या करतूतीमुळे वैतागली होती. त्यामुळे या तिंघानी मिळून शुभ्रज्योतिच्या हत्येचा कट रचला आणि ठार केले. त्याची ओळख पटावी नये म्हणून त्याचे शीर धडावेगळ करून फेकून दिले. अशा क्रुर पद्धतीने त्याची हत्या करण्यात आली. श्रीरामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस यांनी या प्रकरणात  पूजा आणि तिची मैत्रीण शर्मिष्ठाला अटक केली.