गोळी पाठीवर लागो की छातीवर, सिनेमामध्ये नायकाच्या तोंडातूनच का रक्त येतं? कारण जाणून घ्या

 कदाचित तुम्ही चित्रपट पाहताना याकडे लक्ष दिले नसेल किंवा जाणून घ्यायचा प्रयत्न केला नसेल. मात्र आम्ही तुम्हाला चित्रपटातील या दृष्यामागचे गुढ काय आहे हे सांगणार आहोत.

Updated: May 29, 2021, 02:47 PM IST
गोळी पाठीवर लागो की छातीवर,  सिनेमामध्ये नायकाच्या तोंडातूनच का रक्त येतं? कारण जाणून घ्या title=

मुंबई : जगभरात चित्रपटप्रेमींची काही कमी नाही. मात्र, असेही काही लोकं आहेत की, त्यांना चित्रपटात अजिबात रस नाही. तरीही लोकं चित्रपटगृहात किंवा टिव्हीवर कुठला न कुठला चित्रपट बघत बसतात. फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक महिन्याला नवनवीन चित्रपट तयार होत असतात. यामध्ये रोमँटिक, कॉमेडी, हॉरर, अॅक्शन चित्रपट यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. यासगळ्यामधील लोकांना खास करुन रोमँटिक आणि ऍक्शन चित्रपट पाहायला जास्त आवडतात. अनेकदा ऍक्शन चित्रपटात आपण पाहिलं असेल की, एखाद्या व्यक्तीने नायकाला किंवा दुसऱ्या एका व्यक्तीला गोळी मारली की, त्याच्या तोंडातून रक्त यायला लागते. आता सर्वांना हे माहित आहे की, चित्रपटातील दृष्य काल्पनिक असतात याचा कुठल्याच गोष्टीशी संबंध नसतो.

आज आपण जाणून घेऊया की, एखाद्या व्यक्तीने पाठीवर किंवा छातीत गोळी मारली तर, तोंडातूनच का रक्त बाहेर येते. कदाचित तुम्ही चित्रपट पाहताना याकडे लक्ष दिले नसेल किंवा जाणून घ्यायचा प्रयत्न केला नसेल. मात्र आम्ही तुम्हाला चित्रपटातील या दृष्यामागचे गुढ काय आहे हे सांगणार आहोत.

लंडनमधील एका १५ वर्षाच्या यासमीनने याबाबत प्रश्न विचारला होता. यावर डॉ. निशा मानेक यांनी म्हटले की, पोटात झालेल्या जखमांमुळे एखाद्याला रक्ताची उलटी होऊ शकते. याला हेमेटेमिसिस असे म्हटले जाते. जर एखाद्या व्यक्तीला जबर मार लागला असेल तर, शरीरातील रक्त प्रवाह थांबून रक्त पोटात जमा व्हायला सुरूवात होते.

याचप्रकारे फुफ्फुसात रक्तजमा झाल्याने खोकताना काहीवेळा रक्ताची उलटी होऊ शकते. याला हेमोप्टाईसिस असे म्हटले जाते. त्याचबरोबर तोंडात जखम झाली असल्यास तोंडातून रक्त येण्यास सुरूवात होते. यासगळ्याचे कारण देत डॉ. निशा मानेक म्हणाल्या, चित्रपटात जे दृष्य दाखवले जातात ज्यात गोळी लागल्याने तोंडातून रक्त येते यामागील हे कारण आहे. परंतु चित्रपटातील सगळेच दृश्य काल्पनीक असतात. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या कल्पनाशक्ती प्रमाने त्याला दाखवतो, यात फारसे काही तथ्य नसते.