...आणि मृत महिला झाली जिवंत

मृत व्यक्ती जिवंत झाल्याचं आजपर्यंत तुम्ही सिनेमात किंवा गोष्टींत ऐकलं असेल. मात्र, केरळमधील इडुक्कीमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 7, 2017, 09:49 PM IST
...आणि मृत महिला झाली जिवंत title=
Representative Image

केरळ : मृत व्यक्ती जिवंत झाल्याचं आजपर्यंत तुम्ही सिनेमात किंवा गोष्टींत ऐकलं असेल. मात्र, केरळमधील इडुक्कीमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

४० वर्षीय रत्नम नावाच्या महिलेला कावीळ झाली होती. तिच्यावर मदुरई येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यावर उपचार सुरु होते. पण, तिचं शरीर उपचारांना प्रतिसाद देत नव्हतं.

एके दिवशी रत्नम कुठलाच प्रतिसाद देत नव्हती. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यानंतर तिला मृत घोषित केलं. यानंतर तिचा मृतदेह शवगृहात ठेवला.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रत्नमचा मृतदेह शवगृहात ठेवण्यात आला होता. पण, तासाभरानंतर रत्नमचा श्वासोच्छवास पून्हा सुरु झाल्याचं कळलं. मग तिला पून्हा रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात पोलिसांना कळविण्यात आलं असून अधिक तपास सुरु आहे.