मुंबई : भारतीय रेल्वेकरता 2018 हे वर्ष अगदी महत्वाचं आहे. यावर्षी प्रवाशांना अनेक गोष्टींच्या सुविधा मिळाल्या. तसेच रेल्वेचा खूप चांगला विस्तार देखील झाला. टेक्नॉलॉजीमध्ये Train-18 देखील यावर्षी मिळाली जी सेमी हायस्पिड ट्रेन आहे.
ही ट्रेन 180 किमी प्रति ताशी वेगाने चालणार आहे. एकूण भारतीय रेल्वेने प्रवाशांना चांगल्या सुविधा या वर्षात दिल्या आहे.
1. सर्वात मोठा बदल होता बायो टॉयलेट लावणं. पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम स्वच्छतेबद्दल बोलत असतात. स्वच्छ भारत ही त्यांची महत्वाकांक्षी योजना आहे. बायो टॉयलेट लागल्यामुळे ट्रेन पहिल्यापेक्षा स्वच्छ आणि हायजेनिक आहेत. या टॉयलेट्सना साफ करणं अधिक सोईचं आहे. यामुळे रूळांवर घाण पसरत नाही. ट्रेनमध्ये एकूण 1 लाख बायो टॉयलेट लावण्यात आले असून वेगवेगळ्या ट्रेनमध्ये वातावरण प्रफुल्लित राहावं यासाठी पेटिंग करण्यात आलं आहे.
2. रेल्वेने स्वच्छ ट्रेनसोबतच सुंदरेतवर देखील लक्ष दिलं आहे. रेल्वेप्रमाणेच स्टेशन देखील सुंदर केले आहे. पहिल्यापेक्षा आता रेल्वे स्टेशन अधिक साफ आणि आकर्षक केले आहे. याकरता स्टेशनच्या भिंती रंगवल्या आहे. याचं संपूर्ण श्रेय हे स्वच्छ भारत अभियानाला जातं. आतापर्यंत देशातील 65 रेल्वे स्टेशनचं मेकओव्हर झालं आहे.
3. प्रवाशांना सर्वात जास्त त्रास हा तिकिट काढण्यात होत असे. रिझर्वेशन तिकिट ऑनलाइन देखील संपते. पण जनरल तिकिट काढण्यासाठी आता रांगेत उभं राहावं लागणार नाही. UTS ऍपद्वारे जनरल तिकिट काढू शकता.
4. आता सर्वाधिक स्टेशनवर वाय-फाय सुविधा देण्यात आली आहे. प्रवाशांकरता वाय-फाय सुविधा अगदी मोफत दिली आहे. यामुळे प्रवाशी रनिंग स्टेटसप्रमाणेच इतर माहिती जाणून घेऊ शकतात.
5. 2017 मध्ये रेल्वेने ई-कॅटरिंग सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत कोणताही प्रवाशी PNR नंबर मार्फत स्टेशनवर आपल्यासाठी जेवण मागवू शकतात. ही सुविधा SMS द्वारे उपलब्ध आहे.
6. आता रेल्वेतील टीटी देखील हायटेक झाले आहेत. या अगोदर त्यांच्या हातात कागद दिसायचा. ज्यामध्ये ते चार्ट बघत असतं. आता पेपरच्या जागी टॅबलेट दिले आहेत. यामुळे रिकाम्या सिटचा हिशेब लागतो आणि दुसरं काम करण्यास सहजता मिळते.
7. यावर्षी Train 18 चं यशस्वी परीक्षण करण्यात आलं. ही सेमी हायस्पीड ट्रेन असून 180 किमीचा प्रवास करते. ही देशातील पहिली इंजिनलेस ट्रेन असून 31 डिसेंबरच्या अगोदर उद्घाटन केलं जाईल.
8. गेल्या महिन्यात रेल्वेने तेजस एक्सप्रेसचा मेकओव्हर केला. यामध्ये सर्व कोच हायटेक असून पूर्णपणे एअरकंडीश आहे. तसेच टच फ्री टॉयलेट, स्मार्ट विंडो, GPS बेस पॅसेंजर माहिती देखीलयामध्ये आहे