Zomato IPO | कोरोना काळात धमाकेदार कमाईची संधी; आज झोमॅटोचा IPO होणार खुला

फुड डिलेवरी कंपनी झोमॅटोचा 9 हजार 375 कोटी रुपयांचा आयपीओ आज सब्सस्क्रिप्शनसाठी खुला होत आहे

Updated: Jul 14, 2021, 08:32 AM IST
Zomato IPO | कोरोना काळात धमाकेदार कमाईची संधी; आज झोमॅटोचा IPO होणार खुला title=

मुंबई : फुड डिलेवरी कंपनी झोमॅटोचा 9 हजार 375 कोटी रुपयांचा आयपीओ आज सब्सस्क्रिप्शनसाठी खुला होत आहे. 16 जुलै रोजी हा आयपीओ बंद होणार आहे. यासाठी प्राइज बँड 72 -76 रुपये निश्चित करण्यात आले आहे. 

किती गुंतवणूकीची गरज
या आयपीमध्ये 9000 कोटी रुपयांचे शेअर्स जारी करण्यात येणार आहे. यासोबतच इन्फो एज 375 कोटी रुपयांचे शेअर्सची विक्री करणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के म्हणजेच 933 कोटी रुपयांचा हिस्सा राखीव असणार आहे. रिटेल गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावू शकता. यामध्ये जस्तीत जास्त 1.94 लाख रुपये गुंतवू शकता. या आयपीओची सर्वात विशेष बाब म्हणजे 65 लाख शेअर्स कर्माचाऱ्यांसाठी राखीव आहेत.  

कंपनीची सुरूवात 2008 मध्ये झाली होती. ऑनलाईन फुड डिलेवरी क्षेत्रात कंपनीचे भारातात चांगले प्रस्त आहे. कंपनीसोबत लाखो फुड डिलेवरी बॉय जोडले गेले आहेत. जे ग्राहकांपर्यंत फुड पार्सल पोहचवतात. झोमॅटोच्या मते आयपीओतून उभारलेल्या पैशातून कंपनीचा व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे.