..म्हणून नरेंद्र मोदींसाठी हा कलाकार बनवतोय ११० फूटांचे कटआऊट

येत्या १७ सप्टेंबरला नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक कलाकार त्यांच्या खास बर्थ डे गिफ्टची तयारी करत आहे.

Updated: Sep 13, 2017, 06:57 PM IST
..म्हणून नरेंद्र मोदींसाठी हा कलाकार बनवतोय ११० फूटांचे कटआऊट  title=

उत्तर प्रदेश : येत्या १७ सप्टेंबरला नरेंद्र मोदींच्या ६७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक कलाकार त्यांच्या खास बर्थ डे गिफ्टची तयारी करत आहे.

नरेंद्र मोदी सरकार पुढील ११० वर्ष सत्तेत राहावं यासाठी दुबईतील कलाकार  झुल्फिकार हुसैन नरेंद्र मोदींचे ११० फूट उंच कटआऊट तयार करत आहे. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाला हे कटआऊट भेट म्हणून दिलं जाणार आहे.

माजी भाजपा नगरसेवक निरपेंद्र पांडे यांच्या विनंतीवरुन झुल्फिकार हुसैन  दुबईहून उत्तर प्रदेशला आले आहेत. त्यांनी बनवलेले कट आऊट लखनऊमधील भाजपा कार्यालयासमोर उभं राहिल अशी अपेक्षा झुल्फिकार हुसैन यांनी व्यक्त केली आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त १५०० किलो लाडू आणि १०५ किलो वजनाची घंटा भेट म्हणून देण्यात येणार आहे. 

 झुल्फिकार हुसैन दुबईत स्थायिक होण्यापूर्वी  बहुजन समाज पक्षाचे नेते मायावती, कानसीराम आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांचेही कट-आऊट तयार केले आहेत. झुल्फिकार हुसैन दुबईत ऑईल पेंटिग आर्टिस्ट म्हणून काम करतात.