आलिया रोज न चुकता राहाला लिहिते पत्र; पालकांचा मुलांशी संवाद किती महत्त्वाचा

Alia-Ranbir Daughter Raha : आलिया-रणबीर यांनी लेकीची पहिली झलक दाखवल्यानंतर सगळीकडे तिचीच चर्चा आहे. राहाचं आलिया-रणबीर उत्तम संगोपन करत असल्याचं दिसत आहे. असं असताना आलिया राहाला दररोज का पत्र पाठवते? त्यामागे तिचा विचार काय? हे समजून घेऊया. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 23, 2024, 01:09 PM IST
आलिया रोज न चुकता राहाला लिहिते पत्र; पालकांचा मुलांशी संवाद किती महत्त्वाचा  title=

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर ही बॉलिवूडमधील अतिशय चार्मिंग जोडी आहे. 2018 मध्ये हे दोघं 'ब्रम्हास्त्र' सिनेमा दरम्यान डेट करत असल्याची चर्चा झाली. यानंतर 14 एप्रिल 2022 मध्ये या दोघांनी लग्न केलं.  6 नोव्हेंबर 2022 मध्ये या दोघांना गोड मुलगी झाली. जिचं नाव 'राहा' ठेवण्यात आलं. राहाच्या जन्मानंतर तिच्या अनोख्या नावाची आणि त्या नावाचा संबंध आजोबांशी असल्यामुळे त्याची खूप चर्चा झाली. 

सेलिब्रिटी जिथे आपल्या मुलाची झलक मीडियापासून लपवत असतात. तेथे आलिया-रणबीरने ख्रिसमसच्या दिवशी राहाचा चेहरा जगासमोर आणला. राहाचे डोळे आणि तिचा गोंडसपणा यामुळे ती कायमच चर्चेत राहिली. क्युटनेस खच्चून भरलेल्या या राहावर केलेलं संगोपन अतिशय वेगळं असल्याच कायमच अधोरेखित झालं. यामध्ये आलिया दररोज आपल्या लेकीला न चुकता पत्र लिहिते. ती पत्राद्वारे तिच्याशी अनोखा संवाद साधत असल्याचं, रणबीरने सांगितलं. 

आलिया-रणबीरने जिंकली पालकांनी मनं 

आलियाच्या या कृतीने पुन्हा एकदा सगळ्यांच मन जिंकलं आहे. पालक म्हणून रणबीर आलियाची जगासमोर आलेली बाजू अतिशय कौतुकास्पद आहे. मुलांना पालकांची नितांत गरज असते. ते खऱ्या अर्थाने त्यांच्यावर अवलंबून असतात. असं असताना रणबीरने मुलीसाठी कामातून घेतलेला ब्रेक आणि आलियाने मुलीशी केलेला पत्रव्यवहार हा खरोखरच कौतुकाचा विषय आहे. 

संवाद महत्त्वाचा 

अनेकदा मुलं लहान असताना त्यांच्याशी काय बोलायचं? किंवा या वयात मुलांना काय कळतं? असं अनेक पालकांना वाटतं. पण मुलांशी संवाद कायमच महत्त्वाचा असतो. मग मुलं लहान असोत वा मोठी. त्यामुळे पालकांनी मुलांशी कायमच संवाद साधावा. मग त्यासाठी मार्ग कोणताही असो. 

आलियाची ही गोष्ट महत्त्वाची 

आलियाने गरोदरपणातही आणि राहाचा जन्म झाल्यानंतरही आपलं काम सुरुच ठेवलं. राहाच्या जन्मानंतर आलियाला आता फार वेळ राहासोबत घालवता येत नाही. अशावेळी ती राहाला दररोज न चुकता ईमेलद्वारे पत्र लिहिते. आता राहा लहान आहे पण आईला तिच्या त्या त्या वयात नेमकं काय वाटतं होतं? हे माहित असणं गरजेचं आहे. जर पालक दोघंही वर्किंग असतील किंवा कामानिमित्त एकमेकांपासून दूर असतील तर अशावेळी मुलांशी कनेक्ट राहण्यासाठी अशा गोष्टी करणं गरजेचं आहे. 

मुलांशी कनेक्शन महत्त्वाचं 

पालक आणि मुलांचं नातं हे घट्टच असतं यात काहीच शंका नाही. पण पालकांना मुलांची स्पेस ओळखून त्यांच्याशी तसं वागावं लागतं. अशावेळी जनरेशन गॅप दूर करत किंवा अनोखा पर्याय निवडतं कनेक्ट राहणं गरजेचं आहे. अशावेळी पालकांनी आलियासारखी युक्ती वापरायला काहीच हरकत नाही.