घरात चप्पल वापरावी का? थेट तुमच्या आरोग्याशी आहे संबंध!

Health Tips: अनेकजण घरी चप्पल घालतात. अशावेळी संभ्रम निर्माण होतो की, घरी चप्पल घालावी की नाही? कारण तुमच्या चप्पल घालण्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 13, 2024, 05:41 PM IST
घरात चप्पल वापरावी का? थेट तुमच्या आरोग्याशी आहे संबंध! title=

Sleeper Uses Benefits at Home: अनेक भारतीय घरांमध्ये चप्पल घालणे चुकीचे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार किंवा धार्मिक रुढींनुसार घरात चप्पल घालणे चुकीचे आहे. या मागची कारणं वेगवेगळी असली तरीही घरात चप्पल घालताना व्यक्ती थोडीशी मनात भीती बाळगते. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, सगळ्यात पहिला घरी चप्पल घालण्याचा विचार कुणी आणि का केला असेल? असं असलं तरीही आरोग्याच्या दृष्टीकोनातून डॉक्टर घरी चप्पल घालण्याचा सल्ला दिला जातो. 

घरी चप्पल घातल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. तो परिणाम नेमका कसा होतो, हे समजून घेऊया. 

आजारांपासून होतो बचाव 

अनेक लोकांना वर्षभर सर्दी, खोकला आणि तापासारख्या समस्या जाणवतात. अशावेळी रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे असते. अशावेळी चप्पल घालणे महत्त्वाचे असते. कारण चप्पल घरात घातली असेल तर इतर रोगराईंना आटोक्यात आणण्यासाठी याचा फायदा होतो. घरी चप्पल घातल्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही. यामुळे रक्तप्रवाह चांगल्या प्रमाणात होतो. 

बॅक्टेरिया, फंगस इन्फेक्शन होते कमी

अनेकदा घराची फरशी कितीही स्वच्छ आणि साफ दिसली तरीही त्यामध्ये किटाणू, बॅक्टेरिया, जंतू असतात. हे सहज दिसत नाही पण यामुळे फंगस इन्फेक्शनचा त्रास होतो. अशावेळी घरी चप्पल घालणे महत्वाचे आहे, कारण ते आपल्या पायांचे संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. 

समतोल राखण्यासाठी मदत होते 

अनेकदा घरातील ज्येष्ठ मंडळींना तोल जाण्याची समस्या जाणवते. अशावेळी त्यांचे पाऊल योग्य पद्धतीने आणि घट्ट जमिनीवर पडावे म्हणून चप्पल घालण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा वय झाल्यामुळे ज्येष्ठ व्यक्तींचा तोल जातो. अशावेळी चप्पल मदत करते. तसेच पायांना गार लागू नये म्हणून देखील चप्पल घालणे फायदेशीर ठरु शकते. 

पायांची सूज कमी होते 

पायाला सूज येण्यामागील एक मुख्य कारण म्हणजे खराब रक्ताभिसरण. परिस्थिती गंभीर होईपर्यंत अनेकांना पाय सुजल्याचेही कळत नाही. सपोर्टिव्ह फ्लिप फ्लॉप्स परिधान केल्याने तुमच्या पायांमध्ये रक्त प्रवाह वाढू शकतो. त्यामुळे सूज येण्याचे प्रमाण आणखी कमी होईल. तुम्ही दुकानात उत्तम स्वरुपाची चप्पल वापरु शकतो. 

होऊ शकतो परिणाम, काय काळजी घ्याल?

  • चप्पल खरेदी करताना काळजी घ्या
  • चप्पलेला खालून ग्रिप असेल अशी चप्पल निवडा 
  • तसेच चप्पल दर महिन्याला स्वच्छ धुवा 
  • मधुमेहींनी चप्पल विकत घेताना विशेष काळजी घ्या. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)