कोण आहेत ईशा अंबानीची सासू? हार्वर्डमधून घेतलंय शिक्षण तर शास्त्रज्ञ म्हणून केलंय काम

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही सोहळा 12 जुलै रोजी होणार आहे. या बिग फॅट लग्नाची सुरुवात 'मामेरू विधी'ने झाली. या कार्यक्रमात अंबानी कुटुंबातील सदस्यांसह ईशा अंबानीच्या सासू स्वाती पिरामल देखील चर्चेत होत्या.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 10, 2024, 02:55 PM IST
कोण आहेत ईशा अंबानीची सासू? हार्वर्डमधून घेतलंय शिक्षण तर शास्त्रज्ञ म्हणून केलंय काम title=

मुकेश अंबानी-नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचे लग्न सध्या चर्चेत आहे. या बिग फॅट लग्नाची देशातच नाही तर परदेशातही चर्चा आहे. अनंत-राधिकाच्या लग्नाच्या विधींना 3 जुलै रोजी मामेरू सोहळ्याने सुरुवात झाली. मामेरूनंतर अंबानी परिवाराने 4 जुलै रोजी गरबा नाईटचे आयोजन केले होते. दरम्यान, अंबानी कुटुंबातील महिला सतत चर्चेत असतात. मग त्यांचा लूक असो किंवा कपड्यांची स्टाईल या सगळ्यावर चाहत्यांची नजर असते. अनंत-राधिकाच्या लग्नाच्या फंक्शन्समध्ये ईशा अंबानीसोबत तिची सासू स्वाती पिरामलही चर्चेत असते.

स्वाती पिरामल यांचा लूक 

स्वाती पिरामल अनंत-राधिकाच्या मामेरू समारंभात लाल रंगाची साडी परिधान करून पोहोचल्या होत्या. ज्यामध्ये त्या खूपच सुंदर दिसत होत्या. या इव्हेंटनंतर त्यांच्याबद्दल सतत चर्चा होत आहेत आणि लोक स्वाती पिरामलबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. स्वाती पिरामल यांची विशेष अशी ओळख आहे. ही ओळख आपण आज जाणून घेऊया. 

स्वाती पिरामल यांचे शिक्षण

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा हिचे लग्न देशातील आघाडीचे उद्योगपती अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामलसोबत झाले आहे. स्वाती पिरामल आणि अजय पिरामल यांचा आनंद पिरामल हा मुलगा. स्वाती पिरामलच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, त्यांनी हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधून शिक्षण घेतले आहे आणि मुंबईतून एमबीबीएसची पदवीही मिळवली आहे. ईशाच्या सासूच स्वाती पिरामल या व्यवसायाने वैज्ञानिक आणि व्यावसायिक आहेत. त्यांनी विज्ञान, औषधनिर्माण, वित्तीय सेवा आणि तंत्रज्ञान व्यवसायात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

2012 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित 

स्वाती पिरामल यापंतप्रधानांसाठी व्यापार परिषद आणि वैज्ञानिक सल्लागार परिषदेच्या सदस्याही आहेत. एवढेच नाही तर ईशा अंबानीच्या सासूबाईंनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2012 मध्ये त्यांना हा सन्मान देण्यात आला होता. स्वाती पिरामल हेल्थकेअर इनोव्हेशनमध्ये सक्रिय आहेत आणि त्यांचे पती अजय पिरामल यांच्यासह कौटुंबिक व्यवसाय चालवतात. त्या पिरामल ग्रुपच्या व्हाईस चेअरपर्सन देखील आहेत. एवढेच नाही तर त्यांनी हार्वर्ड बोर्ड ऑफ ओव्हरसर्सच्या सदस्यत्वासोबत सार्वजनिक आरोग्याच्या डीनचे सल्लागार अशी पदेही मिळवली आहेत.

माजी पंतप्रधानांसोबत केलंय काम 

ईशा अंबानीच्या सासू स्वाती पिरामल यांनीही देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत काम केले आहे. तिने 2010 ते 2014 दरम्यान माजी पंतप्रधानांसोबत वैज्ञानिक सल्लागार परिषद म्हणून काम केले आणि पंतप्रधानांसाठी व्यापार परिषदेच्या सदस्या देखील होत्या.