मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय. भीमा-कोरेगावच्या घटनेबद्दल राग आहे, मात्र जनतेनं संयम बाळगावा असं आवाहनही आंबेडकर यांनी केलंय.
'झी २४ तास' लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी इथे क्लिक करा
3 Jan 2018, 16:12 वाजता
मुंबई : जे न्याय याकूब मेमनला तोच संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना लावावा - प्रकाश आंबेडकर
3 Jan 2018, 16:12 वाजता
आमच्याच संपाचा आम्हाला फटका बसला, अनेक लोकं या ठिकाणी पोहचले नाहीत... आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल जनतेचे आभार - आंबेडकर
3 Jan 2018, 16:04 वाजता
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर कुर्ला ते सीएसटीएम विशेष लोकल तसेच ठाणे ते कर्जत विशेष लोकल सोडण्यात आली
3 Jan 2018, 16:04 वाजता
रायगड : मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक रोखली, पनवेल - सायन मार्गावरही रास्ता रोका
3 Jan 2018, 16:04 वाजता
मुंबई : 'महाराष्ट्र बंद'च्या प्रतिसादानंतर प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद... 'महाराष्ट्र बंद' मागे घेत असल्याची घोषणा
3 Jan 2018, 16:02 वाजता
मुंबई : हार्बर मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येत आहेत, हार्बर मार्गावर कुर्ला ते सीएसटीएम लोकल धावत आहेत, मानखुर्द येथे दुपारी २ वाजता वडाळा लोकल रोखून धरण्यात आली होती, ही लोकल २० मिनिटे थांबविण्यात आली होती, पोलिसांनी आंदोलकांना पांगविल्यानंतर हार्बर सेवा सुरळीत
3 Jan 2018, 15:14 वाजता
ठाणे : शहरात महाराष्ट्र बंदला सकाळी कमी प्रतिसाद मिळाला परंतु दुपारनंतर मात्र सर्वत्र कडकडीत बंद दिसून येतोय
3 Jan 2018, 15:13 वाजता
ठाणे : ठाण्यातील नितीन कंपनीजवळ ईस्टर्न हायवेवर गेल्या एक तासापासून रास्ता रोको... दोन्ही बाजुंवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
3 Jan 2018, 15:08 वाजता
मुंबई : दुपारी १.०० वाजेपर्यंत बेस्टच्या ४८ बसेसची तोडफोड... चार बस चालक काचा लागून जखमी
3 Jan 2018, 14:57 वाजता
रायगड : महाडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण... ३ ते ४ दुकानांची तोडफोड... बंद दुकानांचे नुकसान केल्याने व्यापारी संतप्त... ५०० व्यापारी पोलीस ठाण्यात पोहचले... आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी