मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय. भीमा-कोरेगावच्या घटनेबद्दल राग आहे, मात्र जनतेनं संयम बाळगावा असं आवाहनही आंबेडकर यांनी केलंय.
'झी २४ तास' लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी इथे क्लिक करा
3 Jan 2018, 12:32 वाजता
सांगली : चौकात आंदोलक मोठ्या संख्येने जमा... मोठा पोलीस बंदोबस्त तैनात... सांगलीतील गाव परिसरात जाऊन भीम सैनिकांची घोषणाबाजी
3 Jan 2018, 12:32 वाजता
पिंपरी चिंचवड : जुना मुंबई - पुणे महामार्ग पिंपरी आंबेडकर चौकात बंद... ग्रेड सेपरेटरमधून वाहतूक सुरू... आंबेडकर चौकात मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा, तणावपूर्ण शांतता
3 Jan 2018, 12:32 वाजता
मुंबई : ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून पवईच्या दिशेने जाणारी वाहतूक पोलिसांनी रोखली... पवईत तणावाचं वातावरण
3 Jan 2018, 12:32 वाजता
मुंबई : दहिसरमध्ये गाड्याची तोडफोड... दहिसर चेक नाका परिसरात वाहतूक सुरू करण्यात आली
3 Jan 2018, 12:32 वाजता
मुंबई : दहिसरमध्ये गाड्याची तोडफोड... दहिसर चेक नाका परिसरात वाहतूक सुरू करण्यात आली
3 Jan 2018, 12:32 वाजता
मुंबई : हाजी अलीकडून वरळी नाका दिशेला जाणाऱ्या उड्डाण पुलावरची वाहतूक बंद... वरळी नाका येथे मोर्चा दाखल झाल्यानं वाहतूक बंद
3 Jan 2018, 12:02 वाजता
मुंबई : एलफिन्स्टन स्टेशनवरील रेल रोको नियंत्रणात... पोलिसांनी आंदोलकांना ट्रॅकवरून बाजूला केल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक पूर्ववत
3 Jan 2018, 12:00 वाजता
मुंबई : असल्फा ते घाटकोपर मार्गावर मेट्रो सेवा आंदोलकांनी पाडली बंद
3 Jan 2018, 11:59 वाजता
मुंबई : एलफिन्स्टन स्टेशनवर रेल रोको... चर्चगेटकडे जाणारी लोकल रोखून धरल्याने पश्चिम रेल्वे विस्कळीत
3 Jan 2018, 11:46 वाजता
मुंबई : हिंदमाता चौक येथे काही लोकांनी दगडफेक... दादर पूर्व भागात दुकानं बंद