मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय. भीमा-कोरेगावच्या घटनेबद्दल राग आहे, मात्र जनतेनं संयम बाळगावा असं आवाहनही आंबेडकर यांनी केलंय.
'झी २४ तास' लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी इथे क्लिक करा
3 Jan 2018, 11:18 वाजता
नंदुरबार : रनाळे गावाजवळ अज्ञातांची एसटी बसवर दगडफेक... बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान... खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवा बंद
3 Jan 2018, 11:17 वाजता
बीड : बंदला संमिश्र प्रतिसाद... मुख्य रस्त्यावरील बाजारपेठ बंद... बीड औरंगाबाद महामार्गावर रांजनी येथे एका चार चाकी वाहनावर दगडफेक
3 Jan 2018, 11:17 वाजता
जालना : भीमा कोरेगाव प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शहरात बंद... रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांकडून बंदचं आवाहन
3 Jan 2018, 11:17 वाजता
लातूर : भीमा कोरेगाव प्रकरणी निलंगा तालुक्यातील केळगाव इथे कार्यकर्त्यांनी केला रास्ता रोको, रस्त्यावर टायर पेटवून केला रास्ता रोको
3 Jan 2018, 11:16 वाजता
सांगली : प्रमुख बाजारपेठा बंद... बंदच्या पार्श्वभूमीवर शाळांनाही सुट्टी... एसटी बस सेवा बंद... मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
3 Jan 2018, 10:10 वाजता
नागपूर : दक्षिण नागपुरातील शताब्दी चौक परिसरात रस्त्यावर टायर जाळून 'रास्ता रोको'चा प्रयत्न... वाहतूक सुरळीत, पोलीस घटनास्थळी
3 Jan 2018, 10:01 वाजता
मुंबई : कांदिवली - अकुर्ली, दिंडोशी - हनुमान नगर, चांदिवली - संघर्ष नगर, खैरानी रोड - साकीनाका, सहर कार्गो, मुलुंड चेक नाका, जिजामाता नगर या भागांतील 'बेस्ट' वाहतूक बंद
3 Jan 2018, 09:59 वाजता
मुंबई : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातल्या एसटी सेवेवर मोठा परिणाम... खबरदारीचा उपाय म्हणून एसटी बस डेपोतच
3 Jan 2018, 09:59 वाजता
पुणे : इंदापूर तालुक्यातील गोतोंडी येथे बारामती- इंदापूर राज्य महामार्गावर टायर पेटवून रास्ता रोको
3 Jan 2018, 09:59 वाजता
मुंबई : महाराष्ट्र बंदला मुंबई, ठाण्यात संमिश्र प्रतिसाद... लोकल आणि बस सेवा सुरळीत