मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय. भीमा-कोरेगावच्या घटनेबद्दल राग आहे, मात्र जनतेनं संयम बाळगावा असं आवाहनही आंबेडकर यांनी केलंय.
'झी २४ तास' लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी इथे क्लिक करा
3 Jan 2018, 14:56 वाजता
मुंबई : कांजुरमार्ग रेल्वे स्टेशनवर जमावाकडून स्टिलच्या खुर्च्या, ट्युबलाईट, वॉटर वेंडिग मशीनची तोडफोड
3 Jan 2018, 14:42 वाजता
परभणी : आरएसएसच्या कार्यालयावर दगडफेक... आंदोलकांचा कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न... बस स्थानक परिसरातील घटना... पोलिसांचा सौम्य लाठीमार
3 Jan 2018, 14:17 वाजता
मुंबई : गेल्या तीन तासांपासून ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे ठप्पच
3 Jan 2018, 13:54 वाजता
पुण्यातील या क्षणाची स्थिती
- अपवाद वगळता संपूर्ण शहारात बंद
- शाळा, कॉलेजेस पूर्णपणे बंद
- काही ठिकाणी व्यावसायिकांचा स्वत:हून प्रतिसाद, काही ठिकाणी जबरदस्तीने बंद
- अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळण
- आतापर्यंत २० ते २२ गाड्या फोडल्या
- ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यावर
- ठिकठिकाणी मोर्चे, निदर्शने आणि ठिय्या
- उपनगरांत काही ठिकाणी तणावाचं वातावरण
- 'समस्त हिंदू आघाडी'च्या मिलिंद एकबोटेंच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त
- अनेक ठिकाणी दगडफेक
- पीएमपील वाहतूक प्रभावीत
- मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त, परिस्थिती नियंत्रणात
3 Jan 2018, 13:53 वाजता
पुणे : पुणे स्टेशन, कॅम्प, ताडीवाला रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड परिसरात आंदोलनकर्ते रस्त्यावर
3 Jan 2018, 13:48 वाजता
ठाणे : लोकमान्य बस डेपोजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात आला
3 Jan 2018, 13:45 वाजता
कोल्हापूर : आंदोलकांनी खाजगी गाड्या फोडल्या... खबरदारीचा उपाय म्हणून शहरातली इंटरनेट सेवा बंद
3 Jan 2018, 13:43 वाजता
मुंबई : कुर्ल्यात आंदोलकांचा रेल रोकोचा प्रयत्न
3 Jan 2018, 13:41 वाजता
पुणे : तासाभराच्या रास्ता रोकोनंतर पुण्यातील सिंहगड रोड, दांडेकर पुलावरील वाहतूक सुरळीत
3 Jan 2018, 13:40 वाजता
मुंबई : दादर, दहिसर, बोरिवली रेल्वे आंदोलन संपलं... वाहतूक पुन्हा सुरू