मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय. भीमा-कोरेगावच्या घटनेबद्दल राग आहे, मात्र जनतेनं संयम बाळगावा असं आवाहनही आंबेडकर यांनी केलंय.
'झी २४ तास' लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी इथे क्लिक करा
3 Jan 2018, 09:58 वाजता
मुंबई : खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक, पुणे,औरंगाबादमध्ये शाळांना सुटी... मुंबईसह राज्यातल्या ४० हजार स्कूल बसही बंद
"It was left for the parents to decide if they want to send their their children to school, hardly 50 students came today. So now we are even sending them back home, teachers will also leave thereafter" says a teacher at Mumbai's Young Ladies High School #BhimaKoregaonViolence pic.twitter.com/YVjlO41rwm
— ANI (@ANI) January 3, 2018
3 Jan 2018, 09:42 वाजता
मुंबई : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलीस बंदोबस्तात वाढ, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सज्ज राहण्याचे आदेश
3 Jan 2018, 09:39 वाजता
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर रेल्वे १०-१५ मिनिटे उशिरानं
Some protesters are not allowing dispatch & reception of suburban trains at Virar. Administration & Security staff making every effort to normalise the situation. Due to this, Services are delayed. @drmbct @rpfwrbct
— Western Railway (@WesternRly) January 3, 2018
Tracks have been evacuated of protestors and train operations have resumed at Virar & Goregaon from 9.05 hrs on WR suburban. Trains are delayed due to it. @drmbct @rpfwrbct
— Western Railway (@WesternRly) January 3, 2018
3 Jan 2018, 09:38 वाजता
कोल्हापूर : गोरगोटी-कोल्हापूर रस्ता बंद... शिळेवाडी फाटा इथं आंदोलकांचं रास्ता रोको
3 Jan 2018, 09:38 वाजता
मुंबई : गोरेगाव रेल्वे स्थानकावर सकाळी साडे आठ वाजल्याच्या सुमारास रेल रोकोचा प्रयत्न... जवळपास १५-२० मिनिटं रेल्वे थांबवण्यात आल्या
3 Jan 2018, 09:32 वाजता
ठाणे : रस्त्यावर रिक्षा आणि इतर वाहतूक सेवा कमी झाल्यानं बाहेर पडलेले नागरिक रस्त्यावर ताटकळले
#Maharashtra: People seen waiting near Thane's Vartak Nagar due to less auto-rickshaws and other transport in the state today #BhimaKoregaonViolence pic.twitter.com/ttc3NpMcIt
— ANI (@ANI) January 3, 2018
3 Jan 2018, 09:21 वाजता
ठाणे : टीएमटी बसेसच्या चाकांमधून हवा काढण्याचा प्रयत्न... टीएमटी बंद ठेवण्याची मागणी
3 Jan 2018, 09:20 वाजता
घाटकोपरमध्ये कडक बंदोबस्त
#Mumbai: Security deployment in Ghatkopar's Ramabai Colony and Eastern Express Highway #BhimaKoregaonViolence pic.twitter.com/KfaeJJJ4Mi
— ANI (@ANI) January 3, 2018
3 Jan 2018, 09:07 वाजता
पोलिसांचं नागरिकांना आवाहन
"Don't believe or spread rumors, continue with your routine activities. Police administration is geared up to deal with any untoward situation" Mumbai Police advises residents #BhimaKoregaonViolence pic.twitter.com/VC8xBnEfwf
— ANI (@ANI) January 3, 2018
3 Jan 2018, 08:57 वाजता
अमरावती : जिल्ह्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त... शहरात महत्त्वाच्या चौकांत, नाक्यांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त... एसटीची वाहतूक सुरळीत प्रवाशांची संख्या मात्र कमी