मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय. भीमा-कोरेगावच्या घटनेबद्दल राग आहे, मात्र जनतेनं संयम बाळगावा असं आवाहनही आंबेडकर यांनी केलंय.
'झी २४ तास' लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी इथे क्लिक करा
3 Jan 2018, 11:38 वाजता
मुंबई : घाटकोपच्या रमाबाई आंबेडकर नगरजवळ ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक रोखली
Mumbai: Protesters continue to block Eastern Express Highway #BhimaKoregaonViolence pic.twitter.com/Usg1jHxV4Y
— ANI (@ANI) January 3, 2018
3 Jan 2018, 11:37 वाजता
बारामती : भिमा कोरगांवच्या घटनेच्या निषेधार्थ बारामती शहरात विराट मोर्चा... हजारो भिमसैनिक मोर्चात सहभागी पोलिसांचा चोख बंदोबस्त
3 Jan 2018, 11:37 वाजता
उस्मानाबाद : पुणे - हैदराबाद महामार्गावर उमरगा येथे आंदोलकांचा रास्ता रोको
3 Jan 2018, 11:31 वाजता
मुंबई : मुंबईत येणारे दोन प्रमुख महामार्ग रोखले... ईस्टर्न आणि वेस्टर्न हायवेवर रास्ता रोको
3 Jan 2018, 11:31 वाजता
बारामती : भिमा कोरगांवच्या घटनेच्या निषेधार्थ बारामती शहरात विराट मोर्चा... हजारो आंदोलक मोर्चात सहभागी पोलिसांचा चोख बंदोबस्त
3 Jan 2018, 11:26 वाजता
रत्नागिरी : रत्नागिरी - नागपूर मार्गदेखील बंद... महामार्गावर वाहतूक कोंडी
3 Jan 2018, 11:26 वाजता
मुंबई : मुंबईहून ठाणे - नाशिककडे जाणारी आणि मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प आहे
3 Jan 2018, 11:24 वाजता
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर बंद... पाली येथे आंदोलकांचा रास्ता रोको
3 Jan 2018, 11:18 वाजता
अमरावती : शहराच्या बडनेरा आणि जुन्या वस्तीत आज सकाळी आंदोलकांनी मोर्चा काढून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली... बडनेरा रेल्वे स्टेशन बडनेरा बस स्थानक परिसरातील दुकानं बंद केली
3 Jan 2018, 11:18 वाजता
मुंबई : घाटकोपर- अंधेरी लिंक रोडवर आंदोलक रस्त्यावर... जागृती नगर मेट्रो स्टेशन जवळ आंदोलकांचं ठिय्या आंदोलन