LIVE : महाराष्ट्र बंदचे क्षणाक्षणाचे अपडेट

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय.

LIVE : महाराष्ट्र बंदचे क्षणाक्षणाचे अपडेट

मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय. भीमा-कोरेगावच्या घटनेबद्दल राग आहे, मात्र जनतेनं संयम बाळगावा असं आवाहनही आंबेडकर यांनी केलंय. 

'झी २४ तास' लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी इथे क्लिक करा

3 Jan 2018, 08:55 वाजता

औरंगाबाद : खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा रात्री १२ वाजल्यापासून बंद... आज रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट बंद राहणार, पोलीस आयुक्तांचा आदेश

3 Jan 2018, 08:49 वाजता

ठाणे : ठाण्यात रेल रोकोचा अयशस्वी प्रयत्न... वाहतुकीवर परिणाम नाही


ठाण्यात 'रेल रोको'चा प्रयत्न

3 Jan 2018, 08:49 वाजता

मुंबई : दादर फुल मार्केट, हॉटेल, टॅक्सी, बस सेवा सुरळीत सुरू... नेहमीच्या तुलनेने गर्दी मात्र कमी

3 Jan 2018, 08:46 वाजता

मुंबई : तीनही मार्गांवरील रेल्वे सेवा सुरळीत सुरू

3 Jan 2018, 08:46 वाजता

रायगड : मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत, शाळा सुरू... 

3 Jan 2018, 08:46 वाजता

रायगड : एसटी सेवाही सुरळीत सुरू... परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेणार  लांब पल्ल्याच्या गाड्या सुरक्षित मार्गापर्यंत धावणार - एसटी प्रशासन 

3 Jan 2018, 08:44 वाजता

रायगड  : जिल्ह्याच्या काही भागात आज बंद... कर्जत खालापूर , गोरेगाव , माणगाव, उरण येथे बंद राहणार

 

3 Jan 2018, 08:43 वाजता

सोलापूर : पोलिसांची फिरती गस्त आणि ठिकठिकाणी  बंदोबस्त तैनात... शहरात तणावपूर्ण शांतता 

3 Jan 2018, 08:43 वाजता

नवी  मुंबई : काही खाजगी शाळांना  सुट्टी, मात्र महापालिका शाळा सुरु... बाजारपेठा बंद

3 Jan 2018, 08:39 वाजता

औरंगाबाद : मध्यवर्ती बस स्थानक बंद... मंगळवारी झालेल्या २१ गाड्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आज खबरदारीचा उपाय म्हणून एसटी सेवा बंद