LIVE : महाराष्ट्र बंदचे क्षणाक्षणाचे अपडेट

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय.

LIVE : महाराष्ट्र बंदचे क्षणाक्षणाचे अपडेट

मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय. भीमा-कोरेगावच्या घटनेबद्दल राग आहे, मात्र जनतेनं संयम बाळगावा असं आवाहनही आंबेडकर यांनी केलंय. 

'झी २४ तास' लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी इथे क्लिक करा

3 Jan 2018, 13:40 वाजता

जालना :भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून परतूरमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

3 Jan 2018, 13:26 वाजता

नवी मुंबई : रबाळे स्टेशनवर आंदोलकांनी रेल्वे रोखली... ट्रान्स हार्बर रेल्वे लाईन ठप्प


आंदोलक रेल्वे रुळावर

3 Jan 2018, 13:24 वाजता

मुंबई : महाराष्ट्र बंद आंदोलनामुळे मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या फेऱ्या सुरक्षेच्या कारणामुळे दिवसभर रद्द करण्यात आल्या आहेत

3 Jan 2018, 13:24 वाजता

ठाणे : सिडको बस स्टॉपवर दोन टीएमटी बस फोडल्या

3 Jan 2018, 13:06 वाजता

मुंबई : मुंबईत पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक रोखली, मेट्रो, आणि लोकल वाहतुकीवरही परिणाम

3 Jan 2018, 13:06 वाजता

पुणे : पुण्यात दांडेकर पुलावरची वाहतूक बंद, एकबोटेंच्या घरावर आंदोलकांचा मोर्चा, तुरळक दगडफेकीत एका बसचं नुकसान 

3 Jan 2018, 13:06 वाजता

मुंबई : रेल्वेची हार्बर लाईन वाशीपुढे बंद 

3 Jan 2018, 13:06 वाजता

नवी दिल्ली : भीमा-कोरेगाव प्रकरणाचे लोकसभेत पडसाद, भाजपशासित राज्यात हिंसाचार वाढला... काँग्रेसचा आरोप, तर काँग्रेसकडून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न, भाजपचा पलटवार 

3 Jan 2018, 12:36 वाजता

मुंबई : रेल्वेच्या तीनही मार्गावरील सेवा विस्कळीत

3 Jan 2018, 12:32 वाजता

सांगली : मारुती चौकातील संभाजी भिडे यांच्या फोस्टरवर आंदोलकांनी केली दगडफेक... मनपाच्या कर्मचाऱ्यांनी पोस्टर हटवले