चिंता वाढली, या जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसीसच्या 26 रुग्णांचा मृत्यू

राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. आता त्यात भर पडली आहे ती  म्युकरमायकोसीस (Mucormycosis) रुग्णांची.  

Updated: May 19, 2021, 10:13 AM IST
चिंता वाढली, या जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसीसच्या 26 रुग्णांचा मृत्यू title=

नागपूर : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. आता त्यात भर पडली आहे ती  म्युकरमायकोसीस (Mucormycosis) रुग्णांची. राज्यात  म्युकरमायकोसीस रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. नागपुरात आतापर्यंत म्युकरने  26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मार्चपासून म्युकरमायकोसीसच्या 600च्यावर रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती कान-नाक-घसा डॉक्टर विदर्भ  संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे यांनी दिली.(26 patients died of Mucormycosis infarction in Nagpur)

Black Fungus: या 10 राज्यांत अति घातक ब्लॅक फंगस  

कान-नाक-घसा डॉक्टर विदर्भ  संघटना अध्यक्ष  डॉ. प्रशांत निखाडे यांनी सांगितले की, काळजी घेण्याची मोठी गजर निर्माण झाली आहे. कोरोना उपचारानंतर अशा रुग्णांत वाढ झाली आहे म्युकर हा जलद पसरणारा बुरशीचा रोग आहे. तो मुख्यतः नाक,डोळे आणि मेंदू यांना बाधित करतो.

काय आहेत लक्षणे

- चेहऱ्यावर स्नायू  दुखणे,चेहऱ्यावर बधिरपणा येणे
- नाक चोंदणे, नाकावर सूज येणे
- एका नाकपुडीत रक्तस्त्राव, काळपट स्त्राव
- चेहरा, डोळ्यावर सूज
- एक पापणी अर्धी बंद राहणे, डोळा दुखणे
- वरच्या जबड्याचे दात दुखणे किंवा हलू लागणे
- ताप, अस्पष्ट दिसणे

प्रतिबंधात्मक उपाय

- रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण
- कान,नाक, घसा नेत्र, दंतरोग तज्ञ यांच्याकडून आठवड्यात एक तपासणी.. लक्षणे आढळल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधणे
- टूथब्रश/मास्क वरचेवर बदलणे
- दिवसातून एकदा गुळण्या करणे,
- वयक्तिक व परिसरातील स्वछता ठेवणे
- मातीत काम करताना वशेतीचे काम करताना पूर्ण बाहिचा शर्ट, फुलपॅन्ट, ग्लोवज घालावे, मास्क वापरावे

हे करु नये

- छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष  करू नये
- घरगुती उपायांचा पर्याय निवडू नये
- वैद्यकीय  सल्ल्याने स्टोरॉईड व औषधाचा वापर करणे