लग्न मंडपाऐवजी व्हराड थेट स्मशानात पोहचलं; सांगलीत भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

सांगलीत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. 

Updated: Apr 17, 2024, 10:24 PM IST
लग्न मंडपाऐवजी व्हराड थेट स्मशानात पोहचलं; सांगलीत भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

Sangli Accident : कोणवर कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही. मोठ्या आनंदात लग्नसहोळ्यासाठी निघालेले व्हराड लग्न मंडपाऐवजीथेट स्मशानात पहोचले आहे. लग्नाचे व्हराड घेवून निघालेल्या वाहनाला अपघात झाला आहे. सांगलीत हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले  आहेत. यामुळे मृतांची संख्या वाढू शकते अशी भिती व्यक्त केली जात आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सांगली जिल्ह्यातील विजापूर -गुहागर महामार्गावरील नागज-जत रोड दरम्यान जांभूळवाडी येथे हा भीषण अपघात झाला आहे. नागजच्या जांभूळवाडी येथे लग्नाला निघालेल्या वऱ्हाडच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले तर अनेक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

क्रुझरमधून लग्नाचे व्हराड निघाले होते. क्रुझरने खाजगी ट्रॅव्हल्सला धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली. मृत कर्नाटकच्या जमखंडी येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सांगलीतील तासगाव येथे हे लग्नाचे व्हराड निघाले होते. 

सोलापूरमध्ये प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा  पलटली

सोलापूरमध्ये प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा पलटी झाली. यामध्ये 5 महिला जखमी झाल्या. स्थानिकांनी जखमी महिलांना रूग्णालयात दाखल केलं. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

About the Author