फोटो काढणे जिवावर बेतले, वालदेवी धरणात 6 जण बुडाले

वालदेवी धरणावर (Valdevi dam) फिरण्यासाठी गेलेल्या सहा तरुण आणि तरुणींचा बुडून मृत्यू झाला. धरणावर उत्साहाच्या भरात फोटो काढत असताना काहींचा तोल गेला आणि वालदेवी धरणात पडले.  

Updated: Apr 17, 2021, 10:40 AM IST
फोटो काढणे जिवावर बेतले, वालदेवी धरणात 6 जण बुडाले title=
छाया - योगेश खरे, नाशिक

नाशिक : जिल्ह्यातील वालदेवी धरणावर (Valdevi dam) फिरण्यासाठी गेलेल्या सहा तरुण आणि तरुणींचा बुडून मृत्यू झाला. धरणावर उत्साहाच्या भरात फोटो काढत असताना काहींचा तोल गेला आणि वालदेवी धरणात पडले. त्यानंतर अन्य बाकीच्यांनी धरणात उडी घेत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तेही बुडाले. सिडको परिसरात हे सहा जण राहत होते. विल्होळी येथील वालदेवी धरणात या सर्व सहा जण बुडाले तर एकाचा मृतदेह रात्री उशिरा हाती लागला. (6 drowned in Valdevi dam at Nashik) या घटनेमुळे शहर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, विल्लोळी गावाजवळील वालदेवी धरणावर पाच तरुणी आणि एक युवक फिरण्यासाठी गेले होते. धरणाच्या कडेला उभे राहून या तरुणी आणि युवक फोटो काढत असताना त्यातील काही जणांचा तोल जाऊन ते पाण्यात पडले आणि ते बुडू लागले. हे लक्षात येतात यातील उर्वरित बाकीच्यांनी देखील पाण्यात उड्या घेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र खोलीचा अंदाज न आल्याने आणि काहींना पोहोता येत नसल्याने  त्यांना वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरले. सहा जणांचा धरणाच्या पाण्यात बुडवून दुर्दैवी  मृत्यू झाला आहे. 

घटना घडल्यानंतर अंधार असल्यामुळे शोधकार्याला अडथळा निर्माण होत होता. त्यापैकी शुक्रवारी रात्री एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे तर, इतर जणांचा शोध आज सकाळपासून सध्या सुरु आहे, नाशिकच्या पाथर्डी भागातील टॉयटो शोरूममागे सिंहस्थ नगर परिसरात हे युवक व युवती राहत होते. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या घटनेमुळे शहर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. तर याबाबत अधिक तपास नाशिक ग्रामीण पोलीस करत आहेत. 

मृतांची नावे

सोनी गमे 
हिंमत चौधरी 
आरती भालेराव 
खुशी वजीर मणियार 
ज्योती गमे 
नाजिया मणियार