मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सातत्याने सुरु आहे. एका महिन्यात 7 ते 8 वेळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांचीच कॅबिनेट राज्याचा कारभार चालवत आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक समस्या तर आहेच त्यासोबतच, प्रशासकिय कामकाज करताना देखील मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवारांसोबत विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या लांबणीवर टिका केली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे आणि आज सकाळी 11 वाजता साधारण एकुण 18 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे 9 आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. यासगळ्यामध्ये विशेष आहे ते 9 हा अंक.
झी मीडियाच्या रिसर्च टीमने या 9 अंकाकडे लक्ष वेधलं आहे. मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि 9 अंक हे एक विशेष समीकरण आहे. चला तर मग जाणून घेऊया...
1. एकनाथ शिंदे यांची जन्म तारखेत 9 फेब्रूवारी 1964 आहे. त्यांचा जन्म दिनांक 9 असा आहे.
2. एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात देखील 9-9 अस प्रमाण ठरलं आहे. आजच्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातून शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावं समोर आली आहेत. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे, बबनराव लोणीकर यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे असं बोललं जातंय.
3. टेंभीनाक्याचा नवरात्री महोत्सव
धर्मवीर आनंद दिघे यांनी 1978 ला जय आंबे माँ सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था जगदंबे संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेअंतर्गत नवरात्री महोत्सवाची परंपरा अजूनही सरु आहे. या नवरात्री महोत्सवाला माजी पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी देखील भेट दिली होती. त्याचबरोबर, चित्रपट अभिनेते देखील या महोत्सवाला भेट देत असतात.
4. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 जूनला राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती आणि 39 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार होतो आहे. 39 या आकड्यामध्ये देखील 9 हा अंक आहे.