रायगडमध्ये भीषण अपघात; शिक्षकांच्या पिकनिकची बस उलटून 7 जण जखमी

खोपोलीजवळ मुंबई-पुणे महामार्गावर बसला हा अपघात झाला आहे. बोरघाटात सायमाळ जवळ ड्रायव्हरचे बसवरूल नियंत्रण सुटले आणि बस उलटली. 

Updated: Nov 20, 2022, 05:31 PM IST
रायगडमध्ये भीषण अपघात; शिक्षकांच्या पिकनिकची बस उलटून 7 जण जखमी title=

प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : रायगडमध्ये(Raigad) एक भीषण अपघात(accident) झाला आहे. खोपोलीजवळ(Khopoli) बोरघाटात शिक्षकांच्या पिकनिकच्या बसला हा अपघात झाला आहे. बस उलटून झालेल्या हा अपघातात ७ जण जखमी झाले आहेत. यांतील एकाची प्रकृती गंभीर आहे.   

खोपोलीजवळ मुंबई-पुणे महामार्गावर बसला हा अपघात झाला आहे. बोरघाटात सायमाळ जवळ ड्रायव्हरचे बसवरूल नियंत्रण सुटले आणि बस उलटली.  या अपघातात 7 प्रवासी जखमी झाले आहेत. तर, एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर खोपोली नगरपालिकेच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईतील चेंबूर मधील जवाहर विद्याभवन शाळेची ही बस होती. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी एकवीरा देवीच्या दर्शनासाठी कार्ला इथं आले होते.  मुंबईकडे परतत असताना त्यांच्या बसला अपघात झाला. या बसमध्ये चालकासह एकूण 18 प्रवासी होते. 

अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक मदतीसाठी धावून आले. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. बस खाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे  मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.